---Advertisement---

‘कोहली-विलियम्सनच्या नेतृत्त्वात मोठे अंतर, WTC फायनलमध्ये दोघांची अग्निपरिक्षा,’ माजी प्रशिक्षकाचे मत

On: रविवार, जून 6, 2021 1:39 PM
---Advertisement---

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांना क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट संघनायकांमध्ये गणले जाते. हे तुल्यबळ कर्णधार आमने सामने आल्यानंतर क्रिकेट दर्शकांचे पैसावसूल मनोरंजन होणार हे निश्चितच. हेच दोन कर्णधार १८ ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भिडणार आहेत. हा सामना केवळ भारत आणि न्यूझीलंड संघातील क्रिकेटपटूंसाठी नव्हे तर कर्णधारांसाठीही कसोटीप्रमाणे असणार असल्याचे मत न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन यांनी मांडले आहेत.

ते म्हणाले की, विराट आणि विलियम्सन हे दोघेही उत्कृष्ट कर्णधार आहेत. परंतु त्यांच्या नेतृत्तवशैलीत फार अंतर आहे. या कर्णधारांच्या नेतृत्त्वातील फरक सांगताना हेसन यांनी म्हटले की, “विलियम्सन परिस्थितीनुसार विरोधी संघावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तर विराट सातत्याने सामन्यावर पकड बनवून ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात विराट आणि विलियम्सनच्या नेतृत्त्वाची परिक्षा असेल.”

“भारत आणि न्यूझीलंड हे बरोबरीचे संघ आहेत. तटस्थ ठिकाणी लढत झाल्या कारणाने अंतिम सामना अतिशय चुरशीचा होणार आहे. जर येत्या काही आठवड्यात उभय संघातील खेळाडू जखमी झाले नाहीत. तर दोन्ही संघ पूर्ण ताकदनिशी मैदानावर उतरतील,” असे शेवटी हेसन म्हणाले.

गतवर्षी भारतीय संघाने न्यूझीलंडचा दौरा केला होता. या दौऱ्यात झालेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान न्यूझीलंडने भारताला व्हाईटवॉश दिला होता. परंतु त्यानंतर भारतीय संघाने कसोटीत भरघोस यश मिळवले. त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला कसोटी मालिकेत पराभवाची धूळ चारली होती. अशात येत्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात कोणता संघ विजयी ठरेल, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

स्टोक्सच्या सावत्र वडिलांनी गोळी झाडून केलती मुलांची हत्या, वाचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग

क्रिकेटसाठी भारत सोडून पाकिस्तानात वसलेले शिलेदार, नवव्या क्रमांकावर झुंजार शतकाची आहे नोंद

आजही इंग्लंडच्या मैदानावर यष्टीरक्षक धोनीचाच धाक, निवृत्तीच्या ६ वर्षांनंतरही ‘हा’ विक्रम अबाधित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---