गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वच क्रिकेट चाहते विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची वाट पाहत आहे. हा सामना १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघामध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपले मत मांडले आहे. यात आता आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूची भर पडली आहे. ब्रँडन मॅक्यूलमला वाटते की, हा सामना न्यूझीलंड संघ जिंकेल. त्याने यामागचे कारण देखील सांगितले आहे.
त्याने इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “मला वाटते की हा सामना ६० टक्के न्यूझीलंडच्या दिशेने असेल आणि ४० टक्के भारतीय संघाच्या दिशेने असेल. न्यूझीलंड संघाला अंतिम सामना खेळण्यापूर्वी, इंग्लंड संघाविरुद्ध २ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे त्यांना सराव करण्याची संधी मिळणार आहे. मला वाटते की, हा सामना अटीतटीचा होईल.”
तो पुढे म्हणाला, “आम्हाला माहिती आहे की भारतीय संघ किती चांगला आहे आणि त्यांच्यामध्ये प्रतिस्पर्धींविषयी कशा भावना आहेत. अगदी भारताप्रमाणेच न्यूझीलंड संघही त्यांचा आदर करतो. मीही एक प्रशंसक म्हणून भारताचा सन्मान करतो. मला वाटते की, आम्ही विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एक रंगतदार सामन्यासाठी तयार आहोत. जो संघ चांगली कामगिरी करेल तोच संघ हा सामना जिंकेल.”
भारतीय संघातील खेळाडू सध्या मुंबईच्या एका हॉटेलमध्ये विलागिकरणाचा कालावधी पूर्ण करत आहेत. ३ जून रोजी भारतीय संघ इंग्लंडला पोहचणार आहे. तर न्यूझीलंड संघ इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. २ जूनपासून इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघामध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाचे संपूर्ण लक्ष या मालिकेवर टिकून असणार आहे. कारण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), रिद्धीमान साहा (फिट असेल तर).
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी न्यूझीलंड संघ-
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सँटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले, शुबमन गिलचा ‘तो’ शॉट त्याच्या फलंदाजीतील मोठी कमजोरी
ENGvsNZ: कसोटी मालिका तोंडावर असताना इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार सराव सत्रात दुखापतग्रस्त