सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची संख्या ही असंख्य आहे. लहान मुलांपासून ते दिग्गज व्यक्तींपर्यंत सर्वजण या माध्यमाचा वापर करतात. यामध्ये क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. क्रिकेटपटू नेमकं काय ट्वीट करतात याकडे चाहत्यांचे बारीक लक्ष असते. जेव्हा खेळाडूंकडून एखादी चूक घडते, तेव्हा त्यांनी चाहत्यांच्या ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. असेच काहीसे सध्या भारतीय संघाचा माजी विस्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्यासोबत घडले आहे. वीरेंद्र सेहवाग ट्वीट केल्यामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. चला तर संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया…
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग ट्वीट (Virender Sehwag Tweet) केल्यामुळे चर्चेत आहे. त्याच्या ट्वीटमुळे एकच खळबळ माजली आहे. सेहवागच्या या ट्वीटला गौतम अदानी (Gautam Adani) यांना दिलेला पाठिंबा म्हटले जात आहे. यामध्ये त्याने भारतीय बाजाराला निशाणा बनवण्याचा कट असल्याचे म्हटले आहे. सेहवागच्या या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी त्याला त्याचा सर्व पैसा अदानीच्या शेअर्समध्ये गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. याव्यतिरिक्त त्याला वाईटरीत्या ट्रोलही केले जात आहे.
सेहवागचे ट्वीट
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने ट्वीट करत लिहिले की, “गोऱ्या लोकांना भारताचा विकास बघवत नाही. भारतीय बाजाराला निशाणा बनवणे हा एक विचारपूर्वक रचलेला कट वाटतो. कितीही प्रयत्न करा, पण नेहमीप्रमाणे भारत आणखी मजबूत होऊन उभा राहील.”
Goron se India ki tarakki bardaasht nahi hoti. The hitjob on India’s market looks like a well planned conspiracy. Koshish kitni bhi kar lein but as always, Bharat aur majboot hi nikalkar ubhrega.
— Virender Sehwag (@virendersehwag) February 6, 2023
सेहवागच्या या ट्वीटला आतापर्यंत 45 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, 3 हजारांहून अधिक कमेंट्सही करण्यात आल्या आहेत. सेहवागच्या या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकास्त्र डागले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सेहवागने त्याचा सर्व पैसा अदानीच्या शेअरमध्ये लावला पाहिजे. तसेच, काहींनी म्हटले आहे की, अदानीचे समर्थन करू नको, नाहीतर तुलाही तोंडघशी पडावे लागू शकते
युजर्सच्या प्रतिक्रिया
एका युजरने लिहिले की, “सर, तुमच्या बॅटिंगमध्ये लय धार आहे, पण तुम्ही चमचे आहात.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “जर तुम्ही खरे भारतीय असाल, तर तुमच्या सर्व पैशांनी अदानीचे शेअर्स खरेदी करा. तसेच, गोर्यांना चोख प्रत्युत्तर द्या.” आणखी एकाने लिहिले की, “तुमचा खूप आदर आहे, पण तुम्ही या सरकारचेही दलाल बनू नका.”
अगर आप सच्चे भारतीय है तो अपना सारा पैसा लगाकर अड़ानी शेयर्स ख़रीद लीजिए और गोरों को करारा जवाब दीजिये।
— Dr Nimo Yadav Commentary (@niiravmodi) February 6, 2023
Sir aapki batting mein badi dhaar hai par aap chamche ho…
— Ashutosh Goswami (@Aashutoshhhhh) February 6, 2023
अड़ानी जैसे चोर भारत नहीं है भारत में बहुत ईमानदार उद्योगपति है जो बिना किसी sarkar के मदद से अच्छा बिज़नेस कर रहे है ।
आपकी बहुत इज्जत है आप भी इस सरकार के दलाल मत बनिये ।
— Tejashwi Sena (@Tejashwi_Sena) February 6, 2023
सेहवागची कारकीर्द
वीरेंद्र सेहवाग याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 104 कसोटी, 251 वनडे आणि 19 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्याने 8586 धावा, वनडेत 8273 धावा आणि टी20त 394 धावा केल्या आहेत. त्याने एकूण 38 आंतरराष्ट्रीय शतकेही झळकावली आहेत. (former opener virender sehwag trolled after tweet in support of gautam adani read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता नाही तर कधी? शुबमन गिलचे आकडे पाहून भज्जीही भारावला, थेट भारताच्या उपकर्णधारालाच केले बाजूला
देशासाठी काहीपण! 26 जानेवारीला केले लग्न, आता हनीमून सोडत ऑस्ट्रेलियाला धूळ चारण्यास पोहोचला नागपुरात