Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशासाठी काहीपण! 26 जानेवारीला केले लग्न, आता हनीमून सोडत ऑस्ट्रेलियाला धूळ चारण्यास पोहोचला नागपुरात

देशासाठी काहीपण! 26 जानेवारीला केले लग्न, आता हनीमून सोडत ऑस्ट्रेलियाला धूळ चारण्यास पोहोचला नागपुरात

February 6, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Team-India

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय क्रिकेट संघाने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे 9 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील 4 सामन्यांपैकी पहिल्या 2 सामन्यांसाठी निवडकर्त्यांनी संघ घोषित केला आहे. तसेच, उर्वरित दोन सामन्यांसाठीचा संघ नंतर घोषित केला जाणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या टी20 आणि वनडे मालिकेपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकणारे भारतीय खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) आणि केएल राहुल (KL Rahul) हेदेखील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेत पुनरागमन करत आहेत. बीसीसीआकडे दोघांनीही लग्नासाठी सुट्टी मागितली होती. तसेच, त्यांना बीसीसीआयकडून सुट्टीदेखील मिळाली होती. मात्र, हे दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी मैदानावर परतले आहेत.

अक्षर पटेल याने गर्लफ्रेंड मेहा पटेल (Meha Patel) हिच्यासोबत 26 जानेवारी रोजी लग्नगाठ बांधली होती. गुजरातमध्ये आधी त्याने वाढदिवस साजरा केला आणि आठवडाभरातच लग्न करत मेहासोबत नवीन आयुष्याची सुरुवात केली. लग्नानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेत उतरणार आहे. विशेष म्हणजे, तो हनीमूनलाही गेला नाहीये.

View this post on Instagram

A post shared by Akshar Patel (@akshar.patel)

लग्नानंतर भारतीय अष्टपैलू अक्षरने हनीमूनला (Axar Patel Honeymoon) न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या कसोटी मालिकेत भारतीय संघाला विजय मिळवणे खूपच गरजेचे आहे. अंतिम सामन्यात जागा मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा विजय खूपच महत्त्वाचा आहे. अक्षरने हनीमून टाळले आहे, परंतु त्याचे संघात निवडले जाणे निश्चित नाहीये.

भारतीय संघाचा अष्टपैलू अक्षर पटेलची टक्कर दुखापतीतून पुनरागमन करत असलेल्या रवींद्र जडेजा याच्यासोबत आहे. जडेजाकडे दांडगा अनुभव आहे. त्याने नुकत्याच रणजी ट्रॉफीतील एका सामन्यात 7 विकेट्स घेत त्याचा फॉर्म सिद्ध केला आहे. त्यामुळे आता अक्षर पटेलला पहिल्या दोन सामन्यात बाकावर बसावे लागणार आहे. (all rounder axar patel comeback from marriage sit out as ravindra jadeja is 1st choice in playing xi)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कंगाल पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने ओकली भारताबद्दल गरळ; जे काय म्हणाला, त्याने तळपायाची आग जाईल मस्तकात
झुलन गोस्वामीकडे आली मुंबई इंडियन्स संघाची महत्वाची जबाबदारी, चार्लोट एडवर्ड्स बनली मुख्य प्रशिक्षक


Next Post
Shubman-Gill

आता नाही तर कधी? शुबमन गिलचे आकडे पाहून भज्जीही भारावला, थेट भारताच्या उपकर्णधारालाच केले बाजूला

Virat-Kohli-And-Virender-Sehwag

भारतीय दिग्गजाच्या एकाच ट्वीटने देशभरात माजवली खळबळ; नेटकरी म्हणाले, 'तुझा आदर आहे, पण तू दलाल...'

R-Ashwin

'मुलांना बीपासून सुरू होणाऱ्या कोणत्या गोष्टीची जास्त गरज?', पोरीचा प्रश्न अन् अश्विनचं भन्नाट उत्तर; वाचा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143