भारतीय महिला संघाचा माजी दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामी हिला मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने मोठी जबाबदारी सोपवली आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये ज्या पद्धतीने युवा खेळाडूंनी संधी मिळते, त्याच पद्धतीने महिला क्रिकेटला चांगले दिवस येण्यासाठी बीसीसीआयने महत्वाचे पाऊल उचलले. यावर्षी बीसीसीआय महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएल सुरू करणार आहे. मुंबई इंडियन्स संघ देखील डब्ल्यूपीएलमध्ये खेळणार असून झुलन गोस्वामी मुंबईच्या या महिला संघाची मेंटॉर आणि गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडेल.
नुकतीच काही महित्यांपूर्वी झुलन गोस्वामी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली. निवृत्तीनंतर काही दिवसांममध्येच ती आता डब्ल्यूपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या मेंटॉर आणि गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल. तसेच इंग्लंड महिला संघाची माजी कर्णधार चार्लोट एडवर्ड्स () मुंबई इंडियन्स महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडेल. यावर्षी मार्च महिन्यात डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम आयोजित केला जाणार असल्याचे सांगितले जाते. भारतीय संघाची माजी अष्टपैलू देविका पल्शिकर मुंबईची फलंदाजी प्रशिक्षक असेल, तर तृप्ति चंदगडकर भट्टाचार्य संघाची मॅनेजर म्हणून कामकाज पाहिल.
झुलन गोस्वामीने तिच्या दोन दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत 350 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या. महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा मान तिच्याच नावावर आहे. तसेच महिला वनडे विश्वचषकातील सर्वाधिक विकेट्स देखील झुलननेच घेतल्या आहेत. झुलन जानेवारी 2016 मध्ये आयसीसी महिला वनडे गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ती बंगाल महिला क्रिकेट संघाचे मार्गदर्शन करत आहे.
चार्लोट एडवर्ड्सच्या कारकिर्दीचा विचार केला, तिने इंग्लंड संघासाठी दोन दशकांपेक्षा अधिक काळ प्रतिनिधित्व केले आहे. तिच्या नेतृत्वातील इंग्लंडने वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक जिंकला आहे. निवृत्तीनंतर एडवर्ड्सने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील अनेक संघांसाठी प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली. एडवर्ड्स आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्येही सामील आहे.
देविका पल्शिकर डावखुरी फलंदाज आहे आणि लेग स्पिन गोलंदाज देखील राहिली आहे. तिने 2014 आणि 2016 दरम्यान भारतीय संघाच्या सहायक प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. ती बांगलादेश महिला संघाची देखील सहायक प्रशिक्षक राहिली आहे. तिच्या कार्यकाळात बांगलादेशने 2018 साली आशिया चषक जिंकला होता. आता या मुंबई इंडियन्सचा महिला संघ या भक्कम सपोर्ट स्टाफच्या मार्गदर्शनता पुरुषांच्या आयपीएलप्रमाणे सर्वोत्तम संघ बनेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. (Charlotte Edwards has been appointed as the head coach of Mumbai Indians Women’s team, while Jhulan Goswami has been appointed as mentor and bowling coach.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर चाहत्यांच्या गंंमतीशीर प्रतिक्रिया
“कसोटी आता फलंदाजांसाठी सोपी राहिली नाही, ऑस्ट्रेलियाला शांत करायचे असेल तर…”