---Advertisement---

विराट की रोहित? कोण आहे टीम इंडियाचा जबरदस्त कर्णधार

On: गुरूवार, ऑक्टोबर 4, 2018 8:06 PM
---Advertisement---

एशिया कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली. भारतीय संघाने या स्पर्धेत अजेय राहत सातव्यांदा या विजेतेपदावर मोहर उमटवली.

रोहितने एशिया कप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने तब्बल 105 च्या सरासरीने 317 धावा केल्या होत्या. या पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनीस प्रभावीत झाला आहे.

खलीज टाइम्सशी बोलताना वकार म्हणाला ”विराट,विराट आहे त्याला तुम्ही बदलू शकत नाहीत. तरीही या संघाने त्याच्या अनुपस्थितीत एशिया कप स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. ”

”रोहितने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. तो शांत स्वभावाचा आहे. त्याची कर्णधार म्हणूनची कामगिरी दिवसेंदिवस सुधारत आहे. त्याला मी आयपीएलमध्येही कर्णधार म्हणून पाहिले आहे. तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे.” असेही वकार युनिस पुढे म्हणाला.

भारतीय संघाच्या सलामीवीराच्या कामगिरीने देखील तो प्रभावित झाला आहे.

भारतीय संघाचे सलामीवीर शिखर आणि रोहितने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादित सर्वात वरचे स्थान मिळवले आहे. शिखरने 342 तर रोहितने 317 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment