जगभरातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणला जाणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या फॉर्ममध्ये नाहीये. नुकत्याच २९ मे रोजी पार पडलेल्या आयपीएल २०२२मध्येही त्याला जास्त यशस्वी कामगिरी करता आलेली नाहीये. २०१९ नंतर त्याच्या बॅटमधून एकही शतक निघाले नाहीये. मात्र, यादरम्यान त्याच्या बॅटमधून महत्त्वपूर्ण खेळी नक्कीच आल्या. असे असले, तरीही काही महिन्यांपासून विराटचा फॉर्म ढासळला आहे. त्यामुळे त्याला महत्त्वाच्या वेळी संघाला विजय मिळवून देण्यातही अपयश आले. अशात पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार सलमान बट याला वाटते की, विराट क्रिकेटच्या भल्यासाठी नक्कीच फॉर्ममध्ये परतेल.
क्रिकेटविश्वात ज्या टी२० लीगची सर्वात चर्चा रंगलेली असते, त्या आयपीएलच्या १५व्या (IPL 15) हंगामात विराट कोहली (Virat Kohli) खराब फॉर्ममध्ये होता. त्याला तब्बल ३ वेळा शून्य धावसंख्येवर बाद व्हावे लागले. त्याने खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये फक्त २ अर्धशतके झळकावली. तो आयपीएलच्या सुरुवातीपासूनच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा भाग आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट (Salman Butt) याला असे वाटते की, खेळणाऱ्यांना माहितीये की, विराट एक संस्था आहे. त्याने एक ऍथलिट, एक फलंदाज आणि एक कर्णधार म्हणून स्वत:ला घडवले आहे.
विराट करणार पुनरागमन
सलमान बट याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर चर्चा करताना म्हटले की, “विराटने आपल्यासाठी एक उच्च मानक स्थापित केले आहेत. तो मागील १४ सामन्यांमध्ये ८ अर्धशतके झळकावली आहेत. ज्यावर कोणीही लक्ष देणार नाहीत. लोकांना वाटते की, तो फॉर्ममध्ये नाहीये. कारण, त्याला शतक बनवण्याची सवय झाली आहे.” सलमाननुसार, “विराट कोहली क्रिकेटच्या भल्यासाठी फॉर्ममध्ये नक्कीच येईल.”
अव्वल खेळाडूंना फॉर्ममध्ये राहण्याची गरज
पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याचा असा विश्वास आहे की, जगातील अव्वल खेळाडूंना फॉर्ममध्ये राहण्याची गरज आहे. कारण, युवा आणि नवोदित खेळाडू वरिष्ठ खेळाडूंना आपला आदर्श मानतात. अशाप्रकारे त्यांची फॉर्ममध्ये राहण्याची जबाबदारी वाढते. बट याच्यानुसार, “जो रुट, विराट कोहली, बाबर आझम आणि केन विलियम्सन सुपर मॉडेल आहेत. त्यांना फॉर्ममध्ये राहण्याची गरज आहे.”
विराटची आयपीएल १५मधील कामगिरी
विराट कोहली याने आयपीएलच्या १५व्या हंगामात १६ सामन्यात फलंदाजी करताना २२.७३च्या सरासरीने ३४१ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने २ अर्धशतकांचाही पाऊस पाडला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मितालीला आवडतात ‘हे’ पुरुष क्रिकेटपटू, सोशल मीडियावर केलं होतं जाहीर
‘हिटमॅन’चा मोठा विक्रम तोडण्यास ‘कॅप्टन’ केएल राहुल सज्ज; दिल्ली टी२०त करणार पराक्रम