भारत श्रीलंका दौऱ्यावर (Team India Sri Lanka Tour) आहे. श्रीलंका दौऱ्यावर भारत 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघ जाहीर देखील झाला आहे. टी20 साठी सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. तर एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताचा कर्णधार आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचा माजी खेळाडू म्हणाला की, बीसीसीआयनं फिटनेसचं नाटक सांगून हार्दिकला भारतीय संघाचा कर्णधार बनवलं नाही.
पाकिस्तानचा माजी खेळाडू रशिद लतीफ (Rashid Latif) त्याच्या यूट्युब चॅनलवर बोलताना म्हणाला की, ते आमच्यासोबतही आहे आणि त्यांच्यासोबतही. खेळाडू तंदुरुस्त नसल्याचं प्रमाणपत्र दिलं जातं. त्यांच्या फिटनेसची चिंता आहे, असे अनेक खेळाडू आहेत जे तंदुरुस्त नाहीत, परंतू ते कर्णधार बनले आहेत आणि महान कर्णधार बनले आहेत. तर, मला वाटतं की हार्दिकबाबत हे फक्त एक निमित्त आहे कारण सूर्या नसता तर रिषभ पंत (Rishabh Pant) भारताचा कर्णधार झाला असता, कारण तुम्हाला भविष्याकडे पहायचं आहे.”
2024च्या टी20 विश्वचषकात हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं होतं. भारतानं यंदाच्या विश्वचषकावर नाव कोरलं. या विजयात हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) महत्वाची भूमिका देखील बजावली होती. परंतू तरीही त्याला टी20 साठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केलं नाही. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टी20 साठी भारतीय संघाचा कर्णधार राहणार आहे.
हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) वय 30 वर्ष आहे. त्यानं भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 532 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 108 आहे. तर सरासरी 31.29 आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 5 अर्धशतक आणि 1 शतक झळकावलं आहे. तर 86 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 1,759 धावा आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 92 आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 11 अर्धशतक आहेत.
पांड्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं 100 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 26.64च्या सरासरीनं 1,492 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 140.88 राहिला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 4 अर्धशतक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या नव्या जर्सीतील वाढले ‘स्टार’, फोटो पाहून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान!
IPL Auction 2025; बीसीसीआय आणि आयपीएल मालकांची होणार बैठक
या 2 स्टार्सपैकी कोणाला प्लेइंग 11 मध्ये स्थान? श्रीलंकेमालिकेपूर्वी हेड कोच गंभीरसमोर मोठे आव्हान