जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाची स्थिती चांगली आहे. ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पहिल्या डावात 469 धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारतीय फलंदाजीला जोरदार धक्का दिला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 5 विकेट गमावून 151 धावा केल्या आहेत. शुक्रवारी (9 जून) तिसऱ्या दिवशी भारतीय संघ किती धावा करतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाकडून (Australia) ट्रॅव्हिस हेडने (travis head) 163 आणि स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) 121 धावा केल्या. सुरुवातीला भारतीय गोलंदाजीसाठी विकेट चांगली मानली जात होती. मात्र, धक्क्यातून सावरलेल्या ऑस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी करत भारतीय संघापुढे 469 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना जास्त वेळ मैदानावर खेळता आले नाही.
भारतीय फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत फक्त रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 48 धावा करू शकला. तसेच, रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली यांना मोकळेपणाने खेळता आले नाही.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर बॉल टॅम्परिंगचा आरोप
दरम्यान, पाकिस्तानचा माजी फलंदाज बासित अलीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला. त्याने सांगितले की, 18 व्या षटकात चेंडूशी छेडछाड झाली होती त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा बाद झाले.
पाकिस्तानी क्रीडा पत्रकार फरीद खानने एक ट्विट केले आणि लिहिले की, “माजी पाकिस्तानी फलंदाज बासिलने भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.” तो म्हणाला की, “भारतीय डावातील 16वी, 17वी आणि 18वी षटके बॉलशी छेडछाड झाल्याचा खात्रीशीर पुरावा आहेत. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांना बाद करणे हा चेंडूशी छेडछाड झाल्याचा पुरावा आहे.”
Former Pakistan batter Basit Ali has accused Australia’s bowlers of ball tampering against India.
He says 16th, 17th and 18th overs of India’s innings were clear evidence of ball tampering, Che Pujara and Virat Kohli’s dismissals were also evidences of ball tampering. #WTCFinal
— Farid Khan (@_FaridKhan) June 8, 2023
हे लक्षात घेण्यासारखे आहे की सामन्याच्या 18 व्या षटकात, पंचांनी चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला कारण त्यांना असे वाटले की बॉल खराब झाला आहे. दोन चेंडूंनंतर मिचेल स्टार्कने कोहलीला अतिरिक्त उसळी देऊन बाद केले. मात्र, चाहत्यांचा असा विश्वास आहे की असे काहीही नाही झाले नाही आणि बेसिल फेक न्यूज पसरवत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमवीर रोहित! 15 धावांवर बाद होऊनही रचला इतिहास, ICC Finalमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकटाच खेळाडू
नॉटआऊट असूनही रहाणेला पंचांनी दिले आऊट, मग मैदानात झालेला ड्रामा आख्ख्या जगाने पाहिला; Video