भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करताना दिसेल. तसेच, भारतीय संघ यावेळी 10 वर्षांपुर्वीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद विजेतेपदाचा बदला घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. भारतीय संघ 2013 पासून एकही आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकलेले नाही.
आयसीसीच्या अंतिम सामन्यामधील कांगारू संघाच्या उत्कृष्ट विक्रमाची सर्वांनाच जाणीव आहे. विजेतेपद पटकावण्याच्या भारताच्या मार्गामध्ये ऑस्ट्रेलिया नक्कीच खडतर आव्हान उभे करेल. चला तर जाणून घेऊया जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना कसा, कधी आणि कुठे पाहता येईल… भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 2023 चा अंतिम सामना कोठे खेळवला जाईल?
सामन्याविषयीची माहिती खाली वाचा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 चा सामना लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना बुधवार (7 जून) पासून सुरू होईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना टीव्ही दर्शकांसाठी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर, सामना दुपारी 3 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्नी प्लस हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात. आत्तापर्यंत दोन्ही संघांमध्ये 106 कसोटी सामने खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाने 44 सामने जिंकले असून, भारताने 32 सामने जिंकले आहेत. 29 सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना बरोबरीत संपला.
WTC फायनलसाठी दोन संघ पुढीलप्रमाणे आहेत:-
भारत:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, केएस भरत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, उमेश यज्ञ, जयदेव उनाडकट, ईशान किशन (यष्टीरक्षक).
स्टँडबाय खेळाडू :
यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया:
पॅट कमिन्स (क), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मायकेल नेसर, स्टीव्ह स्मिथ उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
स्टँडबाय खेळाडू:
मिचेल मार्श, मॅथ्यू रेनशॉ.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी, रौनक साधवानी यांना विजेतेपद
WTC FINAL: यंदाही पाऊस ठरणार विलन? असे असणार लंडनमधील वातावरण, टीम इंडियासाठी…