आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा किताब बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या नावावर केला. विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का देत 6व्यांदा विश्वचषकाची ट्रॉफी उंचावली. दुसरीकडे, पाकिस्तान संघ उपांत्य सामन्यापर्यंतही पोहोचू शकला नव्हता, अशात भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला होता. भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रज्जाक याने असे काही विधान केले आहे, ज्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींचा पारा चांगलाच चढू शकतो.
काय म्हणाला रज्जाक?
अब्दुल रज्जाक (Abdul Razzaq) याने जे विधान केले आहे, त्यासाठी त्याच्यावरही भारतीय क्रिकेटप्रेमींनी जोरदार टीका केली आहे. तसेच, त्यांनी रज्जाकला आधी स्वत:च्या क्रिकेट संघावर लक्ष देण्यास सांगितले आहे. पाकिस्तान संघाच्या टीव्ही शो ‘हसना मना है’वर बोलताना रज्जाकने भारताविषयी गरळ ओकली.
तो म्हणाला, “क्रिकेट जिंकले आणि भारत हारला. जर भारताने विश्वचषक जिंकला असता, तर हे खेळासाठी खूपच दु:खद ठरले असते. त्यांनी परिस्थितीचा फायदा घेतला आणि मी आयसीसी अंतिम सामन्यासाठी इतकी खराब खेळपट्टी कधीही पाहिली नव्हती. भारत हारला, ही क्रिकेटसाठी खूपच चांगली बाब आहे.”
Abdul Razzaq
“Cricket won & India lost. Had India won the World Cup, it would have been a very sad moment for the game. They used conditions to their advantage and I have never seen such a bad pitch for any ICC final before. It's great for cricket that India lost.” pic.twitter.com/IYYUhu1rvL
— Broken Cricket (@BrokenCricket) November 23, 2023
भारताचे स्वप्न तुटले
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे विश्वचषक 2023 अंतिम सामना (World Cup 2023 Final) खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीला उतरला होता. नाणेफेक गमावणे भारताच्या अंगलट आले. यावेळी भारत 50 षटकात दहाच्या दहा विकेट्स गमावत फक्त 240 धावाच करू शकला.
भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सहजरीत्या 43 षटकात 4 विकेट्स गमावत 241 धावा केल्या. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड याने 137 धावांची शतकी खेळी केली होती. विशेष म्हणजे, 2011मध्ये यजमान देशाने विश्वचषक जिंकण्याची पहिलीच वेळ होती. त्यानंतर 2015मध्ये ऑस्ट्रेलियाने यजमानपद स्वीकारत विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2019मध्ये इंग्लंडने यजमानपद सांभाळताना विश्वचषक जिंकला होता. मात्र, भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न तुटले. (former pakistani cricket abdul razzaq on india loss in world cup final cricket won and india lost)
हेही वाचा-
टीम इंडियाचे वर्ल्डकपचे स्वप्न भंगल्यानंतर ममता बॅनर्जींचा मोठा दावा; म्हणाल्या, ‘…तर भारत जिंकला असता’
अरे… ये क्या हुआ! चेंडूवर वीज बनून कोसळला ख्रिस गेल, जोरदार चौकार मारताच बॅटचे झाले दोन तुकडे, Video