पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीने चॅम्पियन्स ट्राॅफीवरुन बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यावर जोरदार टीका केला आहे. भारताचा आयसीसीमध्ये दबदबा आहे. जे जय शहा बोलतील तसेच ते देश ऐकतील. “बाकीचे देश बीसीसीआयच्या विरोधात जात नाहीत. कारण सर्व देश भारतीय संघाचे आणि बीसीसीआयचे कठपुतळी आहेत. असे वक्तव्य माजी पाकिस्तानी क्रिकेटर बासित अलीने केला आहे”.
वास्तविक, चॅम्पियन्स ट्राॅफी 2025 चे आयोजन पाकिस्तानमध्ये केले आहे. ज्यासठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणर नसल्याच्या भूमिकेत आहे. अश्या परिस्थितीत अनेक वृत्त अहवालांमध्ये असा दावा करण्यात आले आहे. आशिया कप प्रमाणेच चॅम्पियन्स ट्राॅफीचे ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत या स्पर्धेचा आयोजन केले जाईल असे बोलले जात आहे. जर असे झाल्यास भारत पाकिस्तानध्ये नाही गेला तर आयसीसीसह पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे मोठ्या प्रमाणता आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्यामळे अनेक माजी क्रिकेटर, पत्रकार भारतीय संघ आणि बीसीसीआयवर टीका करत आहे.
भारतीय संघाच्या या भूमिकेवर बासित अली म्हणाला- सर्व क्रिकेट बोर्ड बीसीसीआयच्या हा मध्ये हा मिळवतात. कारण आयपीएलमधून बीसीसीआय या क्रिकेट बोर्डनां पैसे देते. त्यामुळे जय शहा जे मिळतील तेच शेवट असेल. जर बीसीसीआय सचिव जय शहा म्हणाले चॅम्पियन्स ट्राॅफी पाकिस्तानमध्ये व्हायला पाहिजे तर सर्व क्रिकेट बोर्ड हा म्हणतील आणि ही स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत आयोजन केले तरी सर्व बोर्ड जय शहा यांच्या हा मध्ये हा मिळवतील.
आयसीसी बोर्डाची बैठक कोलंबोमध्ये होत असून, त्यात चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतची परिस्थिती काही प्रमाणात स्पष्ट होऊ शकते. गेल्या वर्षी झालेल्या आशिया चषकातही भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. यानंतर ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत आशिया कप आयोजित करण्यात आला. जर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला नाही तर भारताविरुद्धचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने श्रीलंका किंवा अमेरिकेला हलवले जाऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
“सूर्यकुमार यादव चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार नाही”…माजी खेळाडूची भविष्यवाणी; या खेळाडूचं स्थान निश्चित
श्रीलंकेचे 3 खेळाडू, जे टी20 मालिकेत भारतासाठी मोठा धोका ठरू शकतात
आयपीएलसह भारतासाठी सर्वाधिक टी20 विकेट; तरीही वर्ल्डकपमध्ये…! वाढदिवशी जाणून घ्या फिरकीपटूची आकडेवारी