तब्बल 17 वर्षांनंतर इंग्लंड क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला. या दौऱ्यात इंग्लंड आणि पाकिस्तान संघात 7 सामन्यांची टी20 मालिका खेळण्यात आली. मात्र, या मालिकेत पाहुणा इंग्लंड संघ पाकिस्तानला भलताच महागात पडला. या मालिकेत पाकिस्तानला इंग्लंडकडून 4-3च्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याला टीकांचा सामना करावा लागला. दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी विराट कोहली याच्याशी बाबरची तुलना करत त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यावर पाकिस्तानचा माजी फलंदाज सलमान बट हा भलताच भडकला आहे.
रमीज राजांचे वक्तव्य
रमीज राजा (Ramiz Raja) यांनी म्हटले होते की, “पाकिस्तानमध्ये बाबर आझम (Babar Azam) याच्यावर जोरदार टीका होत आहे, तर भारतीय चाहते विराट कोहली (Virat Kohli) याच्याबद्दल काहीच म्हणत नाहीत. भारतीय संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकला नाही. यानंतर त्यालाही टीकेचा धनी व्हायला पाहिजे होते, पण असे झाले नाही. विराटने अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकले, तेव्हा भारत संपूर्ण आशिया चषक विसरला. आपण असे कधी करू का? आम्ही म्हणतो की, बाबरने शतक लावले, पण त्याचा स्ट्राईक रेट फक्त 135 इतकाच होता.”
‘तुम्हाला योग्य उदाहरण देता येत नाहीये’ – सलमान बट
पाकिस्तानचा माजी फलंदाज सलमान बट (Salman Butt) याने त्याच्या युट्यूब चॅनेलवरून रमीज राजा यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. तो म्हणाला की, “तुम्हाला योग्य उदाहरण देता येत नाहीये. विराट जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने 70हून अधिक शतके झळकावली आहेत. माझ्यामते रमीज राजा खूपच निराश आहे. कदाचित, त्यांना अशी बातमी मिळाली, जी लोकांना काही दिवसांनंतर मिळेल. त्यांनी आणखी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, ज्यांना काहीच अर्थ नव्हता.”
स्ट्राईक रेटवरून मोहम्मद रिझवानवरही झालेली टीका
पाकिस्तान संघ संघात न्यूझीलंडमध्ये तिरंगी मालिका खेळत आहे. पहिला सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाने बांगलादेशला 21 धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यानंतर सावकाश फलंदाजी करण्यावरून मोहम्मद रिझवान यालाही टीकांचा सामना करावा लागला. त्याने 50 चेंडूत 78 धावांची खेळी केली होती. असे असले, तरीही पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने त्याचे समर्थन केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेफालीच्या अर्धशतकामुळे भारताने चोपल्या 159 धावा, गुणतालिकेत टॉपवर राहण्यासाठी द्यावी लागेल झुंज
विश्वचषकाच्या तोंडावर वेस्ट इंडिजच्या खेळाडूवर कारवाई, चार वर्षांसाठी झाले निलंबन; वाचा संपूर्ण प्रकरण