आशिया चषक 2023 स्पर्धेचे वेळापत्रक अधिकृतरीत्या समोर आले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) गुरुवारी (दि. 15 जून) स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या. ही स्पर्धा 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंकेत पार पडणार आहे. या स्पर्धेतील 4 सामने पाकिस्तानात, तर 9 सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहेत. एसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा हायब्रिड मॉडेल स्वीकारल्यानंतर असे वाटत होते की, पाकिस्तानला विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येण्यात कोणतीही अडचण नसेल. मात्र, पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी मोठे वक्तव्य केले, त्यावर आता शाहिद आफ्रिदीने आगपाखड केली आहे.
खरं तर, बीसीसीआयने विश्वचषक 2023 साठी प्रस्तावित केलेल्या वेळापत्रकाशी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सहमत नाहीये. पीसीबी अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध साखळी फेरीतील सामने खेळू इच्छित नाहीये. नजम सेठी म्हणाले की, “वेळ आल्यावर हे निश्चित होईल की, आम्ही जातोय की नाही. त्यानंतर सरकार ठरवेल की, आम्ही कुठे खेळू शकतो. आमचा निर्णय या दोन महत्त्वाच्या अटींवर अवलंबून आहे. आमचं सरकार ठरवणार आहे. जसे जेव्हा भारताची वेळ येते, तेव्हा त्यांचे सरकार ठरवते की, ते कुठे खेळणार. आम्हाला हे विचारण्यात कोणतेच अर्थ नाहीये की, आम्ही अहमदाबाद येथे खेळू किंवा नाही.”
नजम सेठी यांच्या वक्तव्यानंतर आता पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याची प्रतिक्रिया आली आहे. त्याने पाकिस्तान संघाच्या अहमदाबाद (Ahmedabad) येथे न खेळण्याविषयी पीसीबीला खडसावले आहे. आफ्रिदीने पाकिस्तान बोर्डालाच प्रश्न विचारत म्हटले आहे की, “पाकिस्तानच्या खेळाडूंना तिथे खेळण्यात अडचण काय आहे? अहमदाबादच्या खेळपट्टीवर कोणता जादू-टोना केला आहे की, तिथे आगीचा पाऊस पडतोय?”
तो म्हणाला की, “जर भारतीय संघाला अहमदाबाद स्टेडिअममध्येच सामना खेळायचा आहे, तर पाकिस्ताननेही तिथेच खेळले पाहिजे. तसेच, त्यांना पराभूत केले पाहिजे.”
भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023च्या वेळापत्रकाबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाहीये. मात्र, असे म्हटले जात आहे की, भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील महामुकाबला 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे खेळला जाऊ शकतो. (former pakistani cricketer shahid afridi statement on ahmedabad pitch)
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशने उद्ध्वस्त केले कसोटी क्रिकेटचे रेकॉर्ड, अफगाणिस्तावर मिळवला 500हून अधिक धावांनी दणदणीत विजय
सुरेश रैनाचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाला, ‘त्याला खेळवण्यापूर्वी धोनीने माझी परवानगी…’