दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी (०४ मार्च) जोहान्सबर्ग येथे झालेला दुसरा वनडे सामना अतिशय रोमांचक ठरला. दक्षिण आफ्रिकाने अवघ्या १७ धावांनी हा सामना जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दरम्यान या सामन्यापेक्षा जास्त पाकिस्तानचा फलंदाज फखर जमान याच्या विकेटची अधिक चर्चा रंगली आहे. दक्षिण आफ्रिकाचा यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकने त्याच्या द्विशतकावर पाणी फेरल्याने सर्वत्र वाद पेटला आहे. यात उडी घेत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने डीकॉकवर संताप व्यक्त केला आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज अख्तरच्या मते डीकॉकचे कृत्य खेळ भावनेच्या विरुद्ध होते. आपल्या ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ शेअर अख्तर म्हणाला की, “याबाबत नियमही बनवण्यात आले आहेत. त्यानुसार अशाप्रकारची कृती केल्यास संबंधित संघाला ५ धावांचा दंड ठोठावला जातो. याबरोबरच तो चेंडूही पुन्हा टाकावा लागतो. मला फखर जमानला द्विशतक करताना पाहायचे होते. त्याला असे दुर्दैवीपणे बाद होताना पाहून मला खूप वाईट वाटत आहे.”
What a master inning by @FakharZamanLive. Treat to watch. Single handedly brought the game here.
Sad end to the inning. Deserved a 200.
Was the spirit of the game compromised by South Africa & @QuinnyDeKock69 in that run out??Full review: https://t.co/bi2f2Qgxij#PAKvSA pic.twitter.com/7Uvt8Ovhpn
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) April 4, 2021
असा झाला फखर जमान धावबाद
दक्षिण आफ्रिकाचा गोलंदाज लुंगी एन्गिडीने सामन्याच्या शेवटच्या षटकात टाकलेल्या चेंडूवर फखरने फटका मारला. त्यानंतर तो आणि त्याच्याबरोबर फलंदाजीला असलेल्या हॅरीस रॉफने धावा मिळवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी पहिली धाव यशस्वी पार केली. मात्र दुसरी धाव घेत असताना दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक एडेन मार्करमने यष्टीरक्षक उभ्या असलेल्या दिशेने चेंडू फेकला आणि तो चेंडू थेट स्टंपला लागला. त्यावेळी फखर क्रिजमध्ये परतलेला नव्हता, त्यामुळे त्याला बाद होऊन परतावे लागले.
यावेळी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटॉन डीकॉकची चपळता कामी आली. कारण त्याने अशी कृती केली की फलंदाजाला असे वाटेल की क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या बाजूला चेंडू फेकणार आहे. ज्यामुळे फखरने मागे वळून पाहिले आणि त्याला क्रिजमध्ये येण्यास काही सेंकद उशीर झाला आणि तो धावबाद झाला. तसेच अवघ्या ७ धावांनी द्विशतकाची संधीही हुकली.
https://twitter.com/MMumtaz36130331/status/1378915482615619586?s=20
असे असले तरीही, फखर १५५ चेंडूत १९३ धावांची खेळी करत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या खेळीसाठी त्याने १० षटकार आणि १८ चौकार मारले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! फक्त क्विंटन डीकॉक नव्हे तर ‘या’ यष्टीरक्षकानेही पाकिस्तानी फलंदाजाला काढले होते वेड्यात
अरर! क्विंटॉन डीकॉकच्या चालाखीमुळे फखर जमानचे दुसरे वनडे द्विशतक थोडक्यात हुकले, पाहा व्हिडिओ
द्विशतक पूर्ण नाही झाले, पण फखर जमानने सचिन तेंडुलकरला मागे टाकत केला ‘हा’ विश्वविक्रम






