आगामी वनडे विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघाची निवड झाली आहे. भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या 15 खेळाडू व तीन राखीव खेळाडूंची नावे घोषित केली गेली. या संघाचे नेतृत्व बाबर आझम हा करत आहे. मात्र, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ याने थेट बाबरवर टीका केली आहे.
शुक्रवारी पाकिस्तानच्या विश्वचषक संघाची घोषणा केली गेली. या 15 सदस्यीय संघात काही अशा नावांचा समावेश केला गेला आहे ज्याची अनेकांना अपेक्षा नव्हती. नसीम शाह दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी अनुभवी हसन आली याला संधी दिली गेली. तर, सलमान आगादेखील संघातील आपली जागा कायम राखण्यात यशस्वी ठरला. तर, फिरकीपटू उसामा मीर याला देखील संघात जागा मिळाली आहे.
पाकिस्तानच्या या एकूणच संघ निवडीवर आसिफ याने एका ट्विटर स्पेसवर नाराजी व्यक्त केली. या संघात अनेक शिफारसी खेळाडूंचा समावेश असल्याचे त्याने म्हटले. तसेच, पाकिस्तानची गोलंदाजी सर्वोत्तम नसल्याचे तो म्हणाला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या विषयी बोलताना तो म्हणाला,
“बाबर आझम चांगला फलंदाज आहे. मात्र, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्यास तो धावांसाठी संघर्ष करतो. मी अजूनही त्याला गोलंदाजी केल्यास त्याच्याविरुद्ध मेडन ओव्हर टाकू शकतो. पावर प्लेमध्ये तो अधिक प्रमाणात निर्धाव चेंडू खेळत असल्याने दुसऱ्या फलंदाजांवर दबाव वाढतो.”
तसेच बाबर याला लहान वयात आपणच प्रथम निवडल्याचे देखील त्याने म्हटले. याच स्पेसमध्ये त्याने हसन अली याला शिफारसी म्हणून हिणवले. तर, बाबरच्या जागी शाईन आपली याला कर्णधार बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले
(Former Pakistani Pacer Mohammad Asif Slams Babar Azam)
महत्वाच्या बातम्या –
खेळाडू वृत्ती! बांगलादेश-न्यूझीलंड सामन्यात फॅमिली वाली फिलिंग, लिटन दासचा धाडसी निर्णय
न भूतो…! विश्वचषक स्पर्धांमध्ये खणकलंय शाकिबचं नाणं, ‘हा’ भीमपराक्रम करणारा बांगलादेशचा एकमेव धुरंधर