आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champion’s Trophy) पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पण भारतीय संघ इथं खेळायला तयार नाही. त्यामुळे यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन हायब्रीड मॉडेल अंतर्गत केलं जाऊ शकतं. तत्पूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीनं याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, सुरक्षेबाबत काही अडचण आली तर पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाणार नाही.
‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील एका बातमीनुसार बासित अलीनं (Basit Ali) पाकिस्तानला इशारा दिला आहे. तो म्हणाला, “आम्हाला सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घ्यावी लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंड आणि वेस्ट इंडिजसोबत मालिकेचे वेळापत्रक आहे. मात्र, या कालावधीत कोणतीही घटना घडल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केले जाणार नाही. बलुचिस्तान आणि पेशावरमध्ये आमचे जवान शहीद होत आहेत. असं का होत आहे याचं उत्तर सरकारनं द्यावं.”
बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 21 ऑगस्टपासून रावलपिंडी येथे होणार आहे. दुसरा कसोटी सामना 30 ऑगस्टपासून कराचीत खेळला जाणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातही 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी 7 ऑक्टोबरपासून मुलतानमध्ये खेळली जाणार आहे. दुसरी कसोटी 15 ऑक्टोबरपासून कराचीत खेळली जाणार आहे, तर तिसरी कसोटी 24 ऑक्टोबरपासून रावलपिंडीत खेळली जाणार आहे.
आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीचं आयोजन पाकिस्तानकडे असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी जाणार की नाही? याबाबत अद्याप स्पष्ट झालं नाही. अनेक माजी भारतीय दिग्गजांनी भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्राॅफी खेळण्यासाठी जाऊ नका असा सल्ला दिला आहे. त्यामुळे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी पाकिस्तानात जाणार की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी कोण जिंकेल भारत की ऑस्ट्रेलिया? दिग्गज खेळाडूनं केली मोठी भविष्यवाणी
बोली लागल्यास ‘विराट कोहली 30 कोटींहून’ अधिक रुपयांना विकला जाईल, आयपीएल लिलावकर्त्याचा मोठा दावा
स्टार फिरकीपटू भारत विरुद्ध बांग्लादेश कसोटी मालिका खेळणार का नाही? क्रिकेट बोर्डाने स्पष्टचं सांगितले