क्रीडाविश्वात खूपदा असे बघायला मिळते की बऱ्याच खेळाडूंना इंग्रजीत बोलताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये बरेचसे खेळाडू पाकिस्तानचे असतात. पाकिस्तानचा विद्यमान कर्णधार बाबर आझम आणि माजी कर्णधार सरफराज एहमद हे याचे ताजे उदाहरण आहेत. बऱ्याच वेळा या खेळाडूंना इंग्रजी बोलण्यावरुन ट्रोल केले जाते. मात्र, आता पाकिस्तानचा माजी खेळाडू सईद अजमल हा इंग्रजी न बोलता येणाऱ्या खेळाडूंच्या समर्थनात उतरला आहे.
पाकिस्तानचा माजी खेळाडू सईद अजमल (Saeed Ajmal) माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “मला इंग्रजी येत नाही. जेव्हा मी चांगल्या फॉर्ममध्ये असताना नंबर 1चा गोलंदाज बनलो तेव्हा बऱ्याच लोकांनी मला इंग्रजीमध्ये बोलण्याचा सल्ला दिला. तेव्हा त्यांना मी सांगितले की इंग्रजी बोलणे किंवा नाही बोलणे ही माझी मर्जी आहे. जर तुम्हाला माझी मुलाखत हवी असेल तर तुम्ही मला माझ्या मातृभाषेत प्रश्न विचारायला हवे. मला याची लाज नाही वाटत आणि वाटायलाही नाही पाहिजे. आम्हाला इंग्रजी येत नाही आणि आम्ही जे करतोय ते सगळे जग बगत आहे. जगात नंबर एक म्हणजे अस्सल नंबर एक.”
पुढे तो म्हणाला की, “इंग्रजी भाषेची मला जाम चीड आहे. जर तुम्हाला इंग्रजी येत असेल तर तुम्ही जगात सर्वात चांगले आणि जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर तुम्ही वाईट ठरता. तुम्ही क्रिकेटला इंग्रजीशी कसे जोडू शकता. ”
पाकिस्तानच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये सईद अजमल याचा समावेश होतो. त्याने पाकिस्तानसाठी 67 कसोटी, 112 एकदिवसीय आणि 63 टी20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यात 178, एकदिवसीय सामन्यांमध्ये 184 तर टी20 सामन्यांमध्ये 85 विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 500पेक्षा जास्त विकेेट्स घेतल्या. सईद अजमल याने 13 नोव्हेंबर 2017 या दिवशी क्रिकेटच्या सर्व प्रकरातुन निवृत्ती घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिलपाठोपाठ पुजाराचेही दमदार शतक, टीम इंडियाने डाव केला घोषित; बांगलादेशपुढे 512 धावांचे आव्हान
FIFA WC 2022: फ्रांस-अर्जेंटिनाच्या अंतिम सामन्यात पोलंडचा रेफरी, चॅम्पियन्स लीगचा आहे अनुभव