पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष जका अशरफ यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेसंदर्भात मोठे विधान केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका व्हावी आणि या मालिकेचे नाव जिन्ना-गांधी मालिका असावे, असे त्यांनी म्हटले म्हटले आहे. अशरफ यांनी सांगितले की त्यांनी आपल्या कार्यकाळात या मालिकेबद्दल प्रस्ताव मांडला होता. पण त्याचा प्रस्ताव बीसीसीआयने स्विकारला नाही.
अशरफ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “माझ्या कारकीर्दीत मी भारतीय क्रिकेट बोर्डाला सल्ला दिला होता की, दोन्ही देशांचे महान नेते जिन्ना-गांधी (मोहम्मद अली जिन्नाह आणि महात्मा गांधी) यांच्या नावावर क्रिकेट मालिका घ्यावी. पण भारतात नरेंद्र मोदींसारखे नेते असल्याने या प्रस्तावाबाबत बीसीसीआय संकोच करत होती.”
अशरफ म्हणाले की, “ही मालिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्या अॅशेस मालिकेसारखीच असते. यामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेटसंबंध सुधारले असते आणि दोन्ही देशांच्या लोकांना चांगले क्रिकेट पाहण्याची संधी मिळाली असती. ”
“भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही तटस्थ ठिकाणी सामने खेळवले गेले पाहिजेत असे मला वाटते. जर ते घरच्या मैदानावर खेळू शकत नसतील तर ते यूएई, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका किंवा इतर कोणत्याही देशात खेळू शकतात. पण मुख्य मुद्दा असा आहे की, भारतीय बोर्डाने एफटीपी संबंधीचे नियम बदलले आहेत. मंडळाचे सदस्यत्व निश्चित करण्याऐवजी नियमितपणे एकमेकांच्या संघांविरुद्ध खेळणे हे देशासाठी अधिक चांगले ठरले असते,” असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.
सध्या भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये कोणतीही क्रिकेट मालिका खेळली जात नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका 2010-13 मध्ये खेळली गेली होती. जिथे पाकिस्तानचा संघ भारत दौर्यावर आला होता. या दौऱ्यानंतर दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकमेकांविरूद्ध दिसले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत विरुद्ध इंग्लंड वनडे सामना टाय झाला तर…, पाहा काय सांगतात आयसीसीचे ‘नवे’ नियम
मिस्टर ॲन्ड मिसेस चहल, टीम इंडियातील ‘प्रसिद्ध’ जोडप्याचे पुण्यात आगमन; व्हिडिओ व्हायरल
कृणाल पंड्याचे पदार्पण, तर मार्क वुडचे पुनरागमन; ‘असा’ असेल पहिल्या वनडेसाठी भारत-इंग्लंड संघ