भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) त्याच्या विस्फोटक फलंदाजीमुळे ओळखला जात होता. तत्पूर्वी आपल्या वक्तव्याने सेहवाग चर्चेत आला आहे. दरम्यान त्याने भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्याची इच्छा नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) कोणत्याही संघाने ऑफर दिल्यास मी त्याचा नक्कीच विचार करेन. असे तो म्हणाला आहे.
अमर उजालाशी संवाद साधताना वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) म्हणाला की,” भारतीय संघ नाही. पण आयपीएलच्या कोणत्याही संघाने प्रशिक्षकपदाची ऑफर आली तर मी नक्की बघेन. कारण मी भारतीय संघाचा प्रशिक्षक झालो, तर माझ्याकडे पुन्हा 15 वर्षे क्रिकेट खेळतानाची जुनी दिनचर्या असेल. वर्षातील 8 महिने घराबाहेर राहावे लागेल, माझी मुलं अजून लहान आहेत. ती 14 आणि 16 वर्षांची आहेत आणि त्यांना माझी गरज आहे.”
सेहवागच्या आंतरराष्ठ्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 104 कसोटी, 251 एकदिवसीय आणि 19 टी20 सामने खेळले आहेत. 104 कसोटी सामन्यात त्याने 49.34च्या सरासरीने 8,586 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 32 अर्धशतके 23 शतके आहेत. 251 एकदिवसीय सामन्यात त्याने 8,273 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 38 अर्धशतके आणि 15 शतके झळकावली आहेत, तर 19 टी20 सामन्यात त्याने 354 धावा केल्या आहेत. टी20 मध्ये त्याने 2 अर्धशतके लगावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
हरभजन सिंगच्या सल्ल्यामुळे कोहली आहे दिग्गज खेळाडू? माजी खेळाडूने केला खुलासा
मोहम्मद शमी किती श्रीमंत आहे? वाढदिवसादिनी जाणून घ्या एकूण संपत्ती
“आता बदला घेण्याची…” बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया कर्णधाराचे खळबळजनक वक्तव्य