क्रिकेटविश्वातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. आंध्रप्रदेशचा माजी रणजी क्रिकेटपटू नागराजू बुडूमुरू हा अडचणीत सापडला आहे. त्याला मुंबईच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने मोठ्या कंपन्यांच्या संचालकांशी संपर्क साधून क्रिकेटपटूंसाठी स्पॉन्सर्सशिप हवी असल्याचे सांगत लाखोंचा गंडा घालत होता. अशात पोलिसांनी त्याचीच ‘विकेट’ काढली आहे.
नागराजू बुडूमुरू (Nagaraju Budumuru) हा 28 वर्षीय असून त्याने अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. त्याने आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी बोलत असल्याचे भासवून मुंबईतील व्यावसायिकाची 12 लाख रुपयांची फसवणूक केली. एवढेच नाही, तर त्याने 60 कंपन्यांची तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले.
विशेष म्हणजे, बुडूमुरू याने 2014 आणि 2016च्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) हंगामात आंध्रप्रदेश संघाचे प्रतिनिधित्व केले होते. विशेष म्हणजे, तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचाही भाग होता. याव्यतिरिक्त त्याने 2016 ते 2018दरम्यान भारत ब संघाचे प्रतिनिधित्वही केले होते. पोलिसांनी म्हटले आहे की, 2018 मध्ये क्रिकेट कारकिर्दीनंतर त्याने ऐशआरामाचे जीवन जगण्यासाठी फसवणूक केली. अशा कामाची त्याला सवय झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
बुडूमुरी याने शहरातील मोठ्या व्यावसायिक कंपन्यांना स्वत:ची ओळख आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा पीए असल्याचे करून देत होता. तो क्रिकेटपटू रिकी भुईसाठी स्पॉन्सरशिप मागत असल्याचेही त्याने अनेक कंपन्यांच्या प्रतिनिधींना सांगितले होते. कंपनीला विश्वास बसावा म्हणून त्याने आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशनची कागदपत्रेही पाठवली होती. अशात मुख्यमंत्री कार्यालयातून फोन असल्यामुळे कंपनीने ही रक्कम पाठवली होती. पुढे क्रिकेट बोर्डाकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. (Former Ranji cricketer Nagaraju Budumuru from AP arrested in vishing case)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वविजेत्या इंग्लंडच्या ‘या’ कमजोरीमुळे बांगलादेशने जिंकली टी20 मालिका, कर्णधार शाकिबचा मोठा खुलासा
काय दिवस आलेत! फिनिशर दिनेश कार्तिकने गावसकरांना दिले फलंदाजीचे धडे, 25 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ