क्रीडाविश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. नागपूरचे माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर यांचा मंगळवारी (दि. 18 एप्रिल) भीषण अपघात झाला. या अपघातात प्रवीण गंभीररीत्या जखमी झाले, तर त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर घडली. प्रवीण यांची कार एका ट्रकला जाऊन धडकली. एका पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की, ट्रक गावाच्या जवळील महामार्गाच्या बाजूला उभा होता, तेव्हाच प्रवीण यांच्या क्रेटा कारने पाठीमागून ट्रकला धडक दिली.
प्रवीण हिंगणीकर जवळच्या रुग्णालयात दाखल
विदर्भचे माजी रणजी खेळाडू प्रवीण हिंगणीकर (Praveen Hinganikar) पुण्याहून नागपूरला जात होते, तेव्हा त्यांची क्रेटा कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आयशर गाडीला धडकली. या अपघातात प्रवीण गंभीर जखमी झाले, तर त्यांच्या पत्नीने जागीच प्राण सोडले. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कारचा चुराडा झाला. या अपघातानंतर प्रवीण यांना उपचारासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलवले. त्यांच्या हात आणि पायाला दुखापत झाली असून ते सध्या सुखरूप आहेत.
प्रवीण हिंगणीकर (Former Ranji Player Praveen Hinganikar) 65 वर्षीय असून ते माजी रणजीपटू आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे माजी पीच क्युरेटर राहिले आहेत.
प्रवीण हिंगणीकर यांची कारकीर्द
त्यांच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी 52 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यांनी 29.52च्या सरासरीने 2805 धावाही केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 16 अर्धशतकांचाही समावेश आहे. त्यांची यादरम्यान 130 ही सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. तसेच, गोलंदाजी करताना त्यांनी 47 विकेट्सही घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी 17 अ दर्जाचे सामने खेळताना 24.37च्या सरासरीने 390 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी 3 अर्धशतके केली आहेत. यादरम्यान 76 ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. त्यांनी गोलंदाजी करताना 7 विकेट्सही चटकावल्या होत्या. (former ranji player praveen hingnikar car accident update wife dead in maharashtras samruddhi expressway)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्जुनच्या कामगिरीची प्रीती झिंटालाही भुरळ; ट्वीट करत म्हणाली, ‘नेपोटिझममुळे खिल्ली उडवली गेली, पण…’
IPLमध्ये लेकाला खेळताना पाहून सचिनच्या डोळ्यात तरळले अश्रू, अर्जुनची पहिली ओव्हर का आहे खास?