भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज आणि कसोटीतज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणे याच्यासाठी मंगळवारी (दि. 25 एप्रिल) आनंदाची बातमी आली. बीसीसीआयने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यासाठी त्याची 15 सदस्यीय संघात निवड केली. रहाणेने त्याचा शेवटचा कसोटी सामना जानेवारी, 2022मध्ये खेळला होता. त्यामुळे तब्बल 15 महिन्यांनंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. अशात अजिंक्य रहाणेच्या पुनरागमनाविषयी एमएसके प्रसाद यांनी वक्तव्य केले. एमएसके प्रसाद हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवडकर्ते होते.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवडकर्ते एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याचे कौतुक केले. ते म्हणाले की, रहाणेने त्याच्या कारकीर्दीत एवढे चढ-उतार पाहूनही त्याच्या जमिनीशी जोडले राहण्याच्या क्षमतेने त्याची भारतीय संघात पुनरागमन करण्यास मदत केली आहे.
Ajinkya Rahane makes a comeback as India name squad for the World Test Championship Final.#WTC23 | Details 👉 https://t.co/i3bWXIM2ze pic.twitter.com/rT6DoqIJwk
— ICC (@ICC) April 25, 2023
प्रसाद म्हणाले की, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यापूर्वी रहाणेचे संघात पुनरागमन होणे, ही चांगली गोष्ट आहे.
‘रहाणेला संघात निवडणे कौतुकास्पद निर्णय’
माध्यमांशी बोलताना प्रसाद म्हणाले की, कसोटीत माजी उपकर्णधाराचे पुनरागमन, खासकरून श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या अनुपस्थितीत एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रसाद यांनी 7 ते 11 जूनदरम्यान लंडनच्या के ओव्हल मैदानात खेळल्या जाणाऱ्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी योग्य संघाची निवड केल्यामुळे निवड समितीचे कौतुकही केले. ते म्हणाले की, “हा एकदम योग्य संघ आहे. मधल्या फळीत एवढी अनिश्तितता होती. माझ्यामते, हे निवडकर्ते एकदम योग्य होते. मी रहाणेसाठी खूपच आनंदी आहे. तो नेहमीच परदेशात भारतासाठी एक शानदार कामगिरी करणारा फलंदाज ठरला आहे. मला वाटते की, त्याची निवड ही एकदम योग्य आहे. मी रहाणेच्या पुनरागमनाचे श्रेय निवडकर्त्यांना देतो.”
रहाणेचे कौतुक
पुढे बोलताना प्रसाद यांनी रहाणेच्या वृत्ती आणि मजबूत मानसिकतेचे कौतुक केले. ते म्हणाले की, “मुळात त्याची वृत्ती ही एका संन्यासीसारखी आहे. जेव्हा त्याची निवड होत नाही, तेव्हा तो कधीच अस्वस्थ होत नाही. तसेच, जेव्हा त्याची निवड होते, तेव्हा तो खूपच उत्साहीदेखील होत नाही. तो अशाप्रकारचा व्यक्ती आहे. त्याचा मूड खाली-वर होत नाही. तो एक खूपच परिपक्व व्यक्ती आहे.”
खरं तर, अजिंक्य रहाणे याला त्याच्या खराब फॉर्ममुळे भारतीय कसोटी संघातून मागील वर्षी बाहेर केले होते. सध्या त्याचे भारतीय संघातील पुनरागमनामागील मुख्य कारण आयपीएलमधील त्याची शानदार कामगिरी असल्याचे बोलले जात आहे. तो जवळपास 200च्या स्ट्राईक रेटने धावा चोपत आहे. तसेच, तो चांगल्या फॉर्ममध्येही दिसत आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 5 सामन्यात 52.25च्या सरासरीने आणि 199.05च्या स्ट्राईक रेटने 209 धावा केल्या आहेत. पुढील सामन्यांमध्येही संघाला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. (former selector msk prasad impressed with cricketer ajinkya rahane selection in india test team for wtc 2023 final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘काय करतोय तू, 12 सिक्स मारणार का?’, पीयुष चावलाला क्रीझवरून हटवणाऱ्या वढेरावर संतापले नेटकरी
गतविजेत्या गुजरातविरुद्ध हारताच गोलंदाजांवर संतापला रोहित; म्हणाला, ‘फलंदाज पाहून तरी…’