भारतीय संघाचे माजी निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी त्यांच्या कार्यकाळादरम्यान, भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा विचार करता अनेक दिग्गज खेळाडूंविरुद्ध निर्णय घेतले होते. एक वेळ अशी आली होती की, त्यांनी महेंद्रसिंग धोनीला देखील संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याचवेळी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना देखील उधाण आले होते. आता आपल्या निर्णयांबद्दल प्रसाद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मार्च २०२० मध्ये प्रसाद यांच्याजागी सुनिल जोशींनी निवड समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे.
एमएसके प्रसाद यांना विचारण्यात आले की, तुमच्या कार्यकाळादरम्यान धोनीच्या निवृत्तीविषयीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागे होते का? त्यावर प्रसाद यांनी उत्तर दिले की, “निवडकर्ता म्हणून आपल्याला भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा विचार करताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यात तुम्हाला दिग्गज खेळाडूंविरुद्ध देखील निर्णय घ्यावा लागतो.”
योग्य उत्तराधिकारी निवडणे मुख्य काम
त्यांनी सांगितले की, “योग्य उत्तराधिकाऱ्याची निवड करणे हे निवड समितीचे मुख्य काम असते. निवडकर्त्याची भूमिका बजावताना तुम्ही निष्पक्ष असले पाहिजे आणि कठोर निर्णय घेतांना आपल्या भावनांना आपण आवर घातला पाहिजे. धोनी आणि सचिन तेंडुलकर असे खेळाडू शतकात कधीतरी निर्माण होतात. कारण भारतीय क्रिकेटसाठी या दोघाचं योगदान बहुमूल्य राहिले आहे.”
भारत कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात पोहोचण्यात आमचादेखील हातभार
भारतीय संघ पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्यामुळे प्रसाद अतिआनंदित आहेत. प्रसाद यांनी सांगितले की, “आम्हाला इतका आनंद आणि समाधान लाभले आहे. आम्ही आमचे सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघ विश्व कसोटी स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचला. यात आमचे देखील थोडेसे योगदान राहिले. या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थाने भारतीय संघ पात्र होता. कारण मागच्या 4 वर्षांपासून भारतीय संघ कसोटीत अव्वलस्थानी विराजमान आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
केवळ १२ सामने खेळलेल्या पाक गोलंदाजाची ‘भलीमोठी इच्छा’; एबी, कोहली, बटलर अन् मॉर्गनची घ्यायचीय विकेट
इंग्लंडचा सैरसपाटा वा अजून काही! कसोटी चॅम्पियनशीप फायनलनंतर विराटसेनेला मिळणार ‘मोठी’ सूट
आयपीएलची पहिलीवहिली सुपर ओव्हर टाकणारा गोलंदाज आता करतो तरी काय? घ्या जाणून