भारतीय संघात खेळण्यासाठी खूप कौशल्य आणि मेहनतची गरज असते. भारतात अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत, पण प्रत्येक खेळाडू हा भारतीय संघात खेळू शकत नाही. यात भारतीय निवड समितीचा मोठा हात असतो, निवड समितीला खूप विचार करून खेळाडूंची निवड करावी लागते.
एमएसके प्रसादने घेतले होते अनेक दिग्गज खेळाडूं विरुद्ध कठोर निर्णय
टीम इंडियाचे माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांचे म्हणणे आहे की त्यांनी आपल्या कार्यकाळात भारतीय क्रिकेटचे भविष्य लक्षात घेऊन दिग्गज खेळाडूंविरूद्ध कठोर निर्णय घेतले आहे . असा एक वेळ आला जेव्हा त्यांनी धोनीसारख्या खेळाडूलाही संघातून बाहेर ठेवण्याचा कठोर निर्णय घेतला, तर धोनीची निवृत्तीही त्यावेळी चर्चेत होती. मार्च महिन्यात प्रसाद यांचा निवडकर्ता म्हणून कार्यकाळ संपला.
एमएसके प्रसाद यांना विचारले गेले की, तुमच्या कार्यकाळात महेंद्रसिंग धोनीला न खेळवण्याबाबत तुम्हाला किती प्रश्नांचा सामना करावा लागला होता? “निवडकर्ता म्हणून आपल्याला भारतीय क्रिकेटचे भविष्य लक्षात घेऊन काही कठोर निर्णय घ्यावे लागतात ज्यात दिग्गज खेळाडूंच्या विरोधातही जावे लागते,” असे प्रसाद म्हणाले.
मुख्यकार्य म्हणजे योग्य उत्तराधिकारी निवडणे.
ते म्हणाले, “योग्य उत्तराधिकारी ओळखणे हे निवड समितीचे मुख्य काम आहे. निवडकर्ता म्हणून कठोर निर्णय घेताना आपल्याला निःपक्षपाती असणे आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारखे इतर कोणीही असू शकत नाही कारण खेळाडू म्हणून त्यांच्या योगदानाचे कोणतेही मूल्य नाही. ”
जेव्हा संघाचे सात मोठे खेळाडू खेळत नव्हते ..
प्रसाद म्हणाले , “तुम्हाला जे करण्यासाठी बोलवले असते , ते काम आपल्याला पूर्णपणे करावे लागते. संघाचे सात मोठे खेळाडू खेळत नव्हते, त्यानंतर भारत अ च्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौर्यावर त्यांच्या जागी स्थान देण्यात आले आणि संघ विजयी देखील झाला, तो विजय आमच्या परिश्रमांची एक मोठे यश होते.”
कसोटी चॅपियनशिपच्या अंतिम सामन्यातील प्रवेशासाठी भारतीय संघाला आमचे छोटे योगदान
ते म्हणाले की, भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवल्याबद्दल मला फार आनंद झाला आहे. प्रसाद म्हणाले, यातून तुम्हा सर्वांना मिळालेल्या आनंद व समाधानाबद्दल काही शंका नाही. आम्ही निवडीच्या संदर्भात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाला आम्ही आमचे छोटे योगदान दिले. या संघाने सिद्ध केले की भारतीय संघ गेली चार वर्षेपासून कसोटी क्रमवारीत प्रथम स्थानी आहे, आता मला अंतिम सामना बघण्याची उत्सुकता आहे.”
महत्वाच्या बातम्या
क्षमा मागूनही भज्जीवर उडाली टिकेची झुंबड, ‘त्या’ पोस्टमुळे अडकला वादाच्या भोवऱ्यात
‘या’ दिग्गजाच्या नेतृत्त्वाखाली खेळायचं आहे, SRHच्या अव्वल गोलंदाज राशिदची इच्छा
सुनील छेत्रीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, मेस्सीला पछाडत ‘या’ विक्रमात ठरला दुसरा






