---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूचा क्रिकेटला अलविदा…

On: मंगळवार, जानेवारी 14, 2020 10:30 AM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार जेपी ड्यूमिनीने मंगळवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. मागच्या वर्षी विश्वचषकानंतर जेपी डुमिनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु त्यानंतर तो फ्रँचायझी क्रिकेट खेळत होता.

विश्वचषकानंतर जेपी डुमिनी ग्लोबल कॅनडा टी20 लीग आणि कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला होता. तथापि, मझांसी सुपर लीगच्या दुसर्‍या सत्रात त्याला दुखापत झाली.

ड्युमिनीला आता असे वाटते की, तो मैदानावर खेळण्यापेक्षा आता दक्षिण आफ्रिकेतील तरुण खेळाडूंशी आपला अनुभव शेअर करून पुढील पिढीला मार्गदर्शन करु शकतो.

निवृत्तीची घोषणा करताना डुमिनी म्हणाला की, “मी अजूनही भरपूर क्रिकेट खेळू शकतो आणि फ्रँचायझींकडून पैसे कमवू शकतो, परंतु असे केल्याने आयुष्यातला उद्देश संपून जाईल. मला आयुष्याच्या नवीन मार्गावर जाण्यापूर्वी मला जुना मार्ग सोडावा लागला, म्हणूनच मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. ‘

तसेच तो म्हणाला, ‘मला नेहमीच एका उद्देशाने खेळायचे होते, दक्षिण आफ्रिकेकडून खेळणे हे जीवनातील सर्वात मोठे उद्दीष्ट होते. आता मला त्याच उद्देशाने पुढे जात दक्षिण आफ्रिकेच्या तरूण क्रिकेटपटूना तयार करायचे आहे.’

टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा जेपी ड्यूमिनी केल्या आहेत. टी20 मध्ये त्याने 1934 धावा केल्या. आपल्या कारकीर्दीत त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 46 कसोटी, 199 वनडे आणि 81 टी20 सामने खेळले आहेत.

https://twitter.com/Maha_Sports/status/1216928083233538048

https://twitter.com/Maha_Sports/status/1216929168908120065

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---