भारतीय क्रिकेट संघाला शुबमन गिल याच्या रूपाने एक मोठा युवा स्टार मिळाला आहे. या प्रतिभावान युवा फलंदाजाची बॅट गेल्या काही काळापासून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. गिलने आपल्या अप्रतिम फलंदाजीने अनेक महान क्रिकेटूंना आपले चाहते बनवले आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्स याने गिलच्या फलंदाजीबद्दल मोठे विधान केले आहे. डिव्हिलियर्स म्हणाला की, शुबमनला अजून खूप काही शिकायचे आहे.
शुबमन गिल (Shubman Gill) याच्या फलंदाजीबद्दल इंडिया टुडेशी बोलताना एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) म्हणाला, “मला शुभमन गिल याची फलंदाजी पाहणे आवडते. तो पूर्णपणे हुशार खेळाडू आहे. त्याला अजून खूप काही शिकायचे आहे पण त्याने दाखवून दिले आहे की क्रिकेटच्या पुस्तकातील सर्व शॉट्स त्याच्याकडे आहेत जे खेळाडूला यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत.”
एबी डिव्हिलियर्स शुबमन गिलबद्दल बोलताना पुढे म्हणाला, “सर्व गोष्टींचा समतोल राखणे ही त्याच्यासाठी महत्त्वाची बाब आहे, खेळाची लय समजून घेणे ही त्याची बाब आहे. त्याला त्याचा खेळ चांगला समजतो आणि मला वाटते की भविष्यात तो भारतीय संघासाठी खूप धावा करेल.”
एबी डिव्हिलियर्ससारख्या दिग्गजांकडून शुभमन गिलची प्रशंसा होणे ही युवा फलंदाजासाठी मोठी गोष्ट आहे. शुभमन गिलने विश्वचषक 2023 मध्येही महत्त्वाची भूमिका बजावली होती. गिलने कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या साथीने भारताला अनेक सामन्यांमध्ये शानदार सुरुवात करून दिली. या विश्वचषकात त्याने 9 सामने खेळले. यामध्ये त्याने 4 अर्धशतकांच्या मदतीने 354 धावा केल्या.
विश्वचषकात गिलने दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम आमलाचा विक्रमही मोडला. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. (Former South African legend’s eye-catching reaction to Shubman Gill Said He still has a lot)
महत्वाच्या बातम्या
IND vs AUS T20: मालिकेतील पाचवा सामना कधी आणि कुठे पार पडणार? वाचा सर्वकाही
द्रविडची नाळ मातीशी जोडलेली! पत्नीसोबत पायऱ्यांवर बसून पाहिला लेकाचा क्रिकेट सामना, फोटो जोरात व्हायरल