---Advertisement---

बॉंम्बस्फोट झालेल्या कसोटी मालिकेत पदार्पण करणाऱ्या लंकन ओपनरचा क्रिकेटला अलविदा

---Advertisement---

श्रीलंकेचा दिग्गज सलामीवीर फलंदाज थरंगा परणावितानाने काल (२४ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली केली आहे. त्याने आपली निवृत्ती जाहीर केल्यानंतर श्रीलंकेचे क्रीडा मंत्री नमल राजापक्षे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

थरंगाने २१ फेब्रुवारी २००९ मध्ये नॅशनल स्टेडिअम येथे पाकिस्तानविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. ही तीच कसोटी मालिका होती, ज्यात अतिरेक्यांनी खेळाडूंवर हल्ला केला होता. त्यावेळी खेळाडूंना हॅलिकॉप्टरने मैदानाच्या बाहेर नेण्यात आले होते.

थरंगाच्या निवृत्तीबाबत आयसीसीनेही ट्विट केले आहे.

त्याने श्रीलंका संघाकडून आतापर्यंत ३२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३२.५८ च्या सरासरीने १७९३ धावा ठोकल्या आहेत. या धावा करताना त्याने २ शतके आणि ११ अर्धशतकेही आपल्या नावावर केली आहेत.

याव्यतिरिक्त त्याने घरगुती क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने २२२ प्रथम श्रेणी सामने, १३० अ दर्जाचे सामने आणि २९ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने प्रथम श्रेणी सामन्यात १४९४० धावा ठोकल्या आहेत. या धावा करताना त्याने तब्बल ४० शतके ठोकली आहेत. त्याचबरोबर अ दर्जाच्या सामन्यात खेळताना त्याने ८ शतकांच्या मदतीने ४६२० धावा केल्या आहेत, तर टी२०त त्याने ६४२ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-आरसीबीची खरी ताकद असलेले ३ खेळाडू दक्षिण आफ्रिकेहून यूएईत दाखल

-थेट ऊसाच्या फडात जुंपली रोहित- धोनी फॅन्समध्ये हाणामारी, पोस्टर फाडल्याने झाला वाद

-गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या ल्युक राईटला सामनावीर म्हणून मिळाला मिक्सर

ट्रेंडिंग लेख-

-चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून आयपीएलमध्ये गोलंदाजांना धु धु धुणारे क्रिकेटर

-आयपीएल फायनलमध्ये या ३ संघांनी पाहिले आहेत सर्वाधिक पराभव

-तब्बल ७ लाख रुपयांना पडली होती एक धाव, आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---