एशिया कप स्पर्धेतून श्रीलंका संघ साखळीतूनच बाहेर पडला. 5 वेळच्या एशिया कप विजेत्यांना आधी बांग्लादेशाकडून आणि नंतर अफगाणिस्तानकडूनही मोठा पराभव स्वीकारावा लागला होता.
श्रीलंका संघ मागील काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय सामन्यांत संघर्ष करत आहे. संघाला या संघर्षातून बाहेर काढण्यासाठी माजी सलामीवीर तिलकरत्ने दिलशानचा पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा पदार्पण करणाचा विचार करत आहे.
2016 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या दिलशानने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना अॉस्ट्रेलिया विरूध्द सप्टेंबर 2016 मध्ये खेळला होता.
श्रीलंकेचे महान खेळाडू कुमारा संघकारा आणि महेला जयवर्धने यांच्या निवृत्तीनंतर त्यांची सांघिक कामगिरी खूपच सुमार होत आहे आणि त्यात कोणतीच प्रगती दिसून येत नाही.
आपल्या दिलस्कूप या फटक्या साठी प्रसिध्द असणाऱ्या दिलशानला 2019 चा विश्वचषक स्पर्धा खेळण्याची इच्छा होती. पण काही कारणाने त्याने निवृत्ती घेतली होती असे 32 वर्षीय दिलशानने लक एफएम रेडियोशी बोलताना सांगितले होते. बीबीसीचे रिपोर्टर अझम अमीन यांनी सोशिल मेडियावर (ट्विटर )हे प्रसिध्द केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–तब्बल एक वर्षानंतर दिग्गज अष्टपैलू खेळाडूचे टीम इंडियात पुनरागमन
–धोनीसाठी आजचा दिवस खास, बांगलादेशविरुद्ध होऊ शकतो विक्रमांचा विक्रम
–या कारणामुळे सुनील गावस्करांनी फकार जामन आणि दिनेश कार्तिकला सुनावले खडेबोल