---Advertisement---

क्या बात! क्रिकेट खेळून देशसेवा केल्यानंतर, आता ‘हा’ क्रिकेटपटू बनलाय आर्मीमध्ये मेजर

---Advertisement---

गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. संघात उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज असताना देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. एका पाठोपाठ एक पराभव होत असल्याने श्रीलंका क्रिकेट बोर्डने अनेक कर्णधार बदलून पाहिले. तरी देखील संघाला काही फायदा झाला नाही. अशातच श्रीलंका संघाचा माजी कर्णधार क्रिकेट खेळून देशसेवा करत नसला तरी देखील तो आर्मीमध्ये देशसेवा करण्यात व्यस्त आहे.

श्रीलंकेचा माजी कर्णधार दिनेश चंडिमल हा २०२१ च्या सुरुवातीला श्रीलंकेच्या कसोटी संघाचा कर्णधार होता. परंतु अवघ्या ३ महिन्यात खेळ असा काही पालटला की, त्याला कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले. इतकेच नव्हे तर त्याला संघात देखील स्थान मिळाले नाही. परंतु त्याने पुढील आयुष्य कसे जगायचे? याचा मार्ग शोधून काढला आहे. (Former srilankan captain dinesh Chandimal joins srilankan army)

आर्मीमध्ये झाला भरती
दिनेश चंडिमल जानेवारी २०२१ मध्ये ‘श्रीलंका आर्मी वॉलंटियर फोर्स’मध्ये भरती झाला होता. तसेच त्याला आर्मी क्रिकेट संघाकडून खेळण्याची ऑफर देखील मिळाली होती. ही ऑफर त्याने मान्य केली होती. आता तो आपली नवी जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे.

माजी कर्णधार झाला आर्मीमध्ये ‘मेजर’
दिनेश चंडिमलला आर्मीमध्ये मेजर होण्याचा मान मिळाला आहे. आर्मीचे कपडे त्याला सुट करत आहेत. तसेच तो ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडताना दिसून येत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्याला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संघाबाहेर केले होते. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

दिनेश चंडिमलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
दिनेश चंडिमलने आपल्या कारकीर्दीत एकूण ६२ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ४० च्या सरासरीने ४१५८ धावा करण्यात यश आले आहे. तसेच १४९ वनडे सामन्यात त्याने ३२.४ च्या सरासरीने ३६९८ धावा केल्या आहेत. टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने एकूण ५७ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याला १९.३ च्या सरासरीने ८६८ धावा करण्यात यश आले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---