मुंबई । तमिळनाडूचा माजी अष्टपैलू खेळाडू मलोलन रंगराजन यांची सीपीएलमधील सेंट किट्स नेव्हिस पैट्रियट्स संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक पदी नियुक्ती केली आहे.
या निवडीबाबत ते प्रतिक्रिया देताना म्हणाले, “स्वत: ला भाग्यवान मानतो की, आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला आगामी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) प्रशिक्षक होण्याची संधी मिळाली. 18 ऑगस्टपासून सुरू होणार्या या स्पर्धेत मी बरेच काही शिकविण्यासाठी तयार आहे.”
रंगराजन म्हणाले, “माझ्या कोचिंगची कारकिर्द ही खूप लवकर सुरु झाली आहे. मी खूप उत्सुक आहे. यावेळी कोचिंग हे एक आव्हान असेल आणि मी त्यासाठी तयार आहे.”
ते म्हणाले, ”मी प्रथमच कोचिंगची भूमिकेत आहे आणि मी चांगले काम करेल ही आशा आहे. या लीगमधील प्रशिक्षक आणि खेळाडूंकडून शिकेन ज्यात फार मोठी नावे आहेत.”
उत्तराखंडकडून खेळल्यानंतर रंगराजन गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ‘स्काउटिंग’ प्रमुख बनले होते. ते आता कोव्हिड 19 साथीच्या दरम्यान वेस्ट इंडिजचा प्रवास करण्याच्या तयारीला लागले आहेत. या ऑफ स्पिनरने 47 प्रथम श्रेणी सामन्यात 136 बळी घेतले आणि 1379 धावा केल्या आहेत.