2024 लोकसभा निवडणुकांचे बिगूल आता वाजू लागले आहेत. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनंही उमेदवारांची आपली यादी जाहीर केली. या यादीत भारताच्या एका माजी क्रिकेटपटूचं नाव आहे. या क्रिकेटपटूनं टीम इंडियाला 2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसंच तो 2007 मध्ये टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचाही सदस्य होता.
तृणमूल काँग्रेसनं दिग्गज क्रिकेटपटू युसूफ पठाण याला पश्चिम बंगालच्या बहरामपूरमधून तिकीट दिलं आहे. या जागेवरून तो ज्येष्ठ काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढेल.
युसूफ पठाण क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या तुफानी खेळासाठी ओळखला जात होता. तो दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य आहे. 2007 मध्ये पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना जिंकून टी 20 चॅम्पियन बनलेल्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. त्याप्रमाणे तो 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचाही सदस्य होता.
युसूफ पठाणचं कोलकात्याशी खूप खास कनेक्शन आहे. तो आयपीएलमध्ये बराच काळ ‘कोलकाता नाइट रायडर्स’ (केकेआर) कडून खेळला आहे. त्यानं संघाला दोनदा (2012 आणि 2014) चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
युसूफ पठाणनं 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हा सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या टी 20 विश्वचषकातील अंतिम सामना होता. युसूफनं भारतासाठी 57 वनडेत 810 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये गोलंदाजी करताना युसूफ पठाणनं एकूण 33 विकेट घेतल्या आहेत.
याशिवाय युसूफ पठाननं 22 टी-20 सामन्यात 236 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 146.58 होता. पठाणनं आयपीएलमध्ये दीर्घ काळ सेवा दिली. तो 174 आयपीएल सामने खेळला आहे. या दरम्यान त्यानं 142.97 च्या स्ट्राइक रेटनं 3204 धावा ठोकल्या. कोलकाता व्यतिरिक्त तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादकडूनही खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL मध्ये लांब केसांचा लूक घेऊन परततोय ‘थाला’! नेटमध्ये सरावाला सुरुवात; CSK ने शेअर केला व्हिडिओ
विजय-पराजय सर्व समान, 92 वर्षात असं प्रथमच झालं! धरमशाला कसोटी जिंकून भारतानं रचला अनोखा इतिहास