माजी भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने राजकारणात प्रवेश करताच आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. हरियाणा विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये काँग्रेसने विनेश फोगटला जिंद जिल्ह्यातील जुलाना मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. विनेशचा सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून पोस्ट करत विनेशने निवडणुकीची शर्यत जिंकल्याची माहिती दिली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाच्या ताज्या आकडेवारीनुसार विनेश फोगटने 6015 मतांनी विजय मिळवली आहे. विनेश फोगटला एकूण 65080 मत मिळाले. तर भाजपकडून निवडणूक लढवणारे योगेश कुमार यांंचा पराभव झाला. योगेश कुमार यांना 59065 मत मिळाले.
बजरंग पुनियाने ट्विटरवर लिहिले की, “देशाची कन्या विनेश फोगट हिच्या विजयासाठी खूप खूप अभिनंदन. ही लढत फक्त एका जुलाना जागेसाठी नव्हती, फक्त आणखी 3-4 उमेदवारांसह नाही, फक्त पक्षांची लढत नव्हती. ही लढत फक्त पक्षांची होती. देश सर्वात मजबूत अत्याचारी शक्तींविरुद्ध होता आणि विनेश विजयी झाली.
निवडणुक जिंकल्यानंतर विनेश फोगट म्हणाली, “मी तमाम जुलाना जिल्ह्यातील जनतेची ऋणी आहे. सामाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा यासाठी मी नेहमी कार्यस्थान राहीन, क्रीडा क्षेत्राशी निगडीत असल्याने याकडे मी जातीने लक्ष देईन”
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटला मोठा धक्का बसला होता. कुस्तीपटू विनेशने ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटात भाग घेतली होती. तिने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले, परंतु अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी विनेशचे वजन सुमारे 100 ग्रॅमने वाढले होते, ज्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले होते.
हेही वाचा-
IND vs BAN: दुसऱ्या टी20 साठी टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल; अश्या पद्धतीने झाले स्वागत
रणजी ट्राॅफी; मुंबईला धक्का; पहिल्या सामन्यापूर्वी स्टार फलंदाज संघाबाहेर
ऐकावं ते नवलचं! आंतरराष्ट्रीय सामन्यात चक्क फलंदाजी प्रशिक्षकाने केली फिल्डिंग; पाहा VIDEO