वर्ल्ड रेस्लिंग एंटरटेनमेंट म्हणजेच डब्ल्यूडब्ल्यूईचा माजी व्यावसायिक पैलवान शॅड गॅसपार्डचा मृत्यू झाला आहे. रविवारी (१७ मे) गॅसपार्ड समुद्रामध्ये बेपत्ता झाला होता. त्यानंतर आता ३ दिवसानंतर त्याचा मृतदेह व्हेनिस बीचवर मिळाला आहे. तो ३९ वर्षांचा होता.
गॅसपार्ड (Shad Gaspard) आपल्या मुलासोबत दक्षिण कॅलिफोर्निया येथील व्हेनिस बीचवर (Venice Beach) गेला होता. पोहताना तो आणि त्याचा १० वर्षांचा मुलगा आर्येह (Aryeh) समुद्रात ओढावला गेला.
गॅसपार्डच्या मुलाला लाईफ गार्ड्सने वाचवले होते. परंतु त्यांना गॅसपार्डला वाचवता आले नाही. तो घातक लाटांमध्ये अचानक गायब झाला आणि त्यानंतर मागील ३ दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता. गॅसपार्डबरोबर झालेल्या या घटनेबद्दल पोलिसांनी सांगितले होते की, “ज्यावेळी ही घटना झाली, तेव्हा तो किनाऱ्यापासून ४६ मीटर दूर गेला होता. जर तो त्यापेक्षा जवळ असता, तर त्याला वाचविण्यात आले असते.”
गॅसपार्ड डब्ल्यूडब्ल्यूईमुळे खूप प्रसिद्ध झाला होता. तो एक किक- बॉक्सरदेखील होता. डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये तो क्राईम टाईम आणि जेटीजीबरोबर टॅग टीममध्ये खेळत होता. २०१०मध्ये गॅसपार्डने निवृत्ती घेतली होती. यानंतर त्याने टी.व्ही. आणि चित्रपटांमध्ये छोट्या- मोठ्या भूमिका केल्या आहेत.
गॅसपार्ड बेपत्ता झाल्यानंतर डब्ल्यूडब्ल्यूईमधील व्हिन्स मॅकमोहन, द रॉक, गोल्डबर्ग, केव्हिन ओव्हेंस, ख्रिस जॅरिको, एमव्हीपी, माईक फॉली यांसारख्या दिग्गजांनी त्याच्या वाचण्याची प्रार्थना केली होती. परंतु तसे काही झाले नाही.
डब्ल्यूडब्ल्यूईने ट्वीट केले की, “डब्ल्यूडब्ल्यूई शॅड गॅसपार्डच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत आहे. कृपया या कठीण काळात त्यांना नेहमी आपल्या लक्षात ठेवत रहा.”
WWE’s thoughts are with the family of Shad Gaspard. Please continue to keep them in your thoughts during this difficult time. pic.twitter.com/uBk0Qo9lXt
— WWE (@WWE) May 19, 2020
डब्ल्यूडब्ल्यूईचे सीईओ व्हिंस मॅकमहोन (Vince McMahon) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले की, “या कठीण काळात आम्ही सर्व गॅसपार्डच्या कुटुंबासोबत आहोत.”
The thoughts of everyone at WWE are with Shad Gaspard’s family during this difficult time. pic.twitter.com/dLRnF6oElX
— Vince McMahon (@VinceMcMahon) May 19, 2020
द रॉक (The Rock) या नावाने प्रसिद्ध असलेला ड्वेन जॉनसननेदेखील ट्वीट करत लिहिले की, “माझ्या प्रार्थना आणि आशा शॅड गॅसपार्डची पत्नी आणि मुलासह आहेत. आपण या वेळेचा विचार करू शकत नाही, हे खूप कठीण आहे. तो एक महान व्यक्ती होता.”
My prayers and hope for Shad Gaspard’s wife, son and family during this unthinkable time. Man, this is a tough one. A really tough one.
Great guy.— Dwayne Johnson (@TheRock) May 20, 2020
एमव्हीपीने (MVP) गॅसपार्डला आपला लहान भाऊ असल्याचे सांगितले आणि म्हटले की, “गॅसपार्ड मोठ्या मनाचा होता. तो नेहमी त्रास देणारा भाऊ होता. आम्ही एकमेकांना नेहमी त्रास दिला, परंतु खूप प्रेमही दिले. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक हास्य असायचे.”
Shad Gaspard had a HUGE heart. He was like an annoying little brother at times. We often gave eachother a hard time, but always with love! He always had a big smile on his face and was ready to share a laugh! I have… https://t.co/YC1VaiEAoi
— MVP (@The305MVP) May 18, 2020
तसेच केव्हिनने (Kevin) लिहिले की, “मी नुकतेच गॅसपार्डबद्दल वाईट बातमी वाचली. मी कल्पनाही नाही करू शकत की त्याच्या कुटुंबावर काय घडले असेल.”
I just read the awful news about Shad Gaspard. I can’t imagine what his family is going through. My thoughts go out to them.
— Kevin (@FightOwensFight) May 18, 2020
याव्यतिरिक्त डब्ल्यूडब्ल्यूईमधील इतर दिग्गजांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
https://twitter.com/IAmJericho/status/1262513398270451714
https://twitter.com/Goldberg/status/1262485870264889347
https://twitter.com/RealMickFoley/status/1262507158282870791
ट्रेडिंग घडामोडी-
-क्रिकेटमधील हे १० हटके स्टॅट्स आजचा तुमचा दिवस करतील खास, पहा
-आयपीएलमध्ये हॅट्रिक विकेट घेणारे ७ वेगवान गोलंदाज
-रोहितने द्विशतक केलं की कोहली होतो रनआऊट, पहा कोणं म्हणतंय हे






