जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) (BCCI) युवा भारतीय क्रिकेटपटूंना विचारत घेत एक शानदार निर्णय घेतला आहे. युवा क्रिकेटपटू तसेच वरिष्ठ क्रिकेटपटूंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) (NCA) विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगलोर येथेच नव्या एमसीएचा भूमिपूजन समारंभ बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) व बीसीसीआयचे सचिव जय शहा (BCCI Secretary Jay Shah) यांच्या हस्ते पार पडला. जय शहा यांनी ट्विटर पोस्टद्वारे याबाबतची माहिती दिली. ( New NCA Foundation Stone Ceremony)
आयपीएल मेगा लिलावानंतर दुसऱ्या दिवशी बेंगलोर येथे नव्या एनसीएच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे नवे प्रशिक्षण केंद्र जुन्या एनसीए शेजारीच असेल. शहा यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की,
‘नव्या एनसीएचा कोनशिला समारंभ पार पडला. भारतीय क्रिकेटची परंपरा जपण्यासाठी व युवा खेळाडूंना पुढे येण्यासाठी याचा निश्चित फायदा होईल.’
Laid the foundation stone for @BCCI’s new NCA. It is our collective vision to have a Centre of Excellence which nurtures talent and supports the cricket ecosystem in 🇮🇳. Jai Hind! @SGanguly99 @ThakurArunS @ShuklaRajiv @VVSLaxman281 pic.twitter.com/0EMzssMJIe
— Jay Shah (@JayShah) February 14, 2022
या असतील नव्या एनसीएत सुविधा
या नव्या विस्तारित एनसीएमध्ये खेळाडूंना अजूनही चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यात येतील. हे नवे एनसीए ४० एकर परिसरात पसरलेले असेल. यामध्ये ४० प्रॅक्टिस खेळपट्ट्या, २० फ्लड लाइट, २५० निवासी खोल्या व १६ हजार स्क्वेअर फुटांची सुसज्ज जिम असेल. तसेच या परिसरात खेळाडूंना शॉपिंग सेंटर, एटीएम, बँक या आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात याच प्रशिक्षण केंद्रात इतर खेळांच्या खेळाडूंसाठी देखील वेगळी सोय करण्यात येईल.
भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचे ठरते एमसीए
भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने एनसीएचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या प्रशिक्षण केंद्रात युवा खेळाडूंपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्यात येते. युवा खेळाडूंना पैलू पाडण्याचे काम येथेच केले जाते. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दुखापतग्रस्त झाल्यास ते इथूनच आपले पुनर्वसन करताना दिसून येतात. भारताचे दिग्गज माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हे सध्या एनसीएचे संचालक आहेत.
महत्वाच्या बातम्या-
स्टीव्ह स्मिथचे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहून सर्वच झाले आश्चर्यचकित, पाहा व्हिडिओ
‘धोनीला १२ कोटी, तर तुला १४ कोटी, याकडे कसा पाहातो?’, प्रश्नावर दीपक चाहरने दिले ‘असे’ उत्तर
डू प्लेसिस, कोहली, मॅक्सवेल; कोण होईल आरसीबीचा भावी कर्णधार? माइक हेसनने केला खुलासा