पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने वनडे क्रिकेटमध्ये नुकताच 5000 धावांचा टप्पा पार केला. न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात बाबरने 117 चेंडूत 107 धावा केल्या होत्या. हे त्याचे 18वे वनडे शतक होते. बाबर या शतकानंतर सर्वात जलत 5000 धावा करणारा फलंदाज बनला आहे. या खेळीनंतर त्याने दिलेल्या एका मुलाखतीत चार फलंदाजांची नावे सांगितली, जे सध्या सर्वोत्तम प्रदर्शन करत आहेत.
आधुनिक युगातील चार फलंदाज बाबर आझम (Babar Azam) याला आवडतात. विशेष म्हणजे बाबरने निवडलेल्या या चौघांमध्ये भारतीय दिग्गज विराट कोहली याचे नाव नाहीये. बाबरने आधुनिक युगातील आपल्या आवडत्या चार फलंदाजांमध्ये केन विलियम्सन, उब्दुल्ला शफीक, जो रुट आणि जोस बटलर यांची निवड केली आहे. विराटसह फॅब फोरमधील स्टीव स्मिथचे नावही बाबरने घेतले नाहीये. निवडलेल्या चौघांना खेळताना पाहून आनंद मिळतो, असेही बाबर म्हणाला.
आधुनिक युगातील बाबर आझमला आवडणारे चार फलंदाज
केन विलियमसन
अब्दुल्ला शफीक
जो रूट
जोस बटलर
पाकिस्तानसाठी वनडे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न
वनडे क्रिकटेमध्ये सर्वात जलद 5000 धावा पूर्ण केल्यानंतर बाबारचे पुढचे लक्ष पाकिस्तानला वनडे विश्वचषक जिंकवून देण्याचे आहे. आयसीसी वेबसाईटशी बोलताना बाबरने ही इच्छा व्यक्त केली आहे. संघाचा कर्णधार या नात्याने पाकिस्तानला वनडे विश्वचषक जिंकवून द्यायचा आहे, असे बाबर म्हणाला. दरम्यान, पाकिस्तानने इम्रान खान यांच्या नेतृत्वात 1992 साली वनडे विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर मागच्या तीस वर्षांमध्ये एकदारी पाकिस्तानला विश्वचषक जिंकता आला नाहीये.
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचवा वनडे सामना बाबरसाठी खास
दरम्यान, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा पाचवा म्हणजेच शेवटचा सामना रविवारी (7 मे) खेळला जाईल. बाबरच्या वनडे कारकिर्दीतील हा 100वा सामना असेल. वनडेत त्याने आपला पहिला सामना 2015मध्ये खेळला होता. 100 सामन्यांचा टप्पा ओलांडण्यासाठी बाबरला तब्बल आठ वर्ष लागली. (Four batsmen Babar Azam likes in the modern era)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आधी वाद नंतर गळाभेट! सिराज-सॉल्टने दाखवली खिलाडूवृत्ती, सोशल मीडियावर होतंय कौतुक
“दिल्लीने विराटला आपल्या संघात घ्यावे”, दिग्गजाने घातली भावनिक साद