आयपीएल प्ले ऑफमध्ये शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना झाला. यात हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यामुळे बेंगलोर संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. संघाचा कर्णधार विराट कोहली या सामन्यात सलामीला फलंदाजीला आला होता. या सामन्यात संघात ४ बदल करत विराटने एक खास विक्रम केला.
परंतू नाणेफेक वेळी जेव्हा विराटला या सामन्यात केलेले बदल विचारण्यात आले, तेव्हा त्याने गेल्या सामन्यातील ११ खेळाडूंपैकी केवळ ७ खेळाडूंना संधी देत संघात ४ बदल केल्याचे सांगितले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध साखळी फेरीत खेळलेल्या ख्रिस मॉरीस, जोशुऑ फिलीप, शाहबाझ अहमद व इसुरा उडाना यांना या सामन्यात संधी देण्यात आली नाही. तर ऍरॉन फिंच, ऍडम झंपा, नवदीप सैनी व मोईन अली यांनी संधी देण्यात आली.
आयपीएल २०२०मध्ये दोन सामन्यात तब्बल ४ बदल करणारा बेंगलोर यामुळे पहिला संघ ठरला आहे. तर फारच क्वचित वेळा साखळी फेरीतील सामन्यानंतर प्ले ऑफमध्ये एखाद्या संघाने एवढे बदल केले आहेत. यापुर्वी याच हंगामात राजस्थान रॉयल्सने दिल्लीविरुद्धच्या ६व्या सामन्यात व हैदराबादविरुद्धच्या ७व्या सामन्यात संघात एवढे बदल केले होते. परंतू ते साखळी फेरीचे सामने होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-ब्रेकिंग ! गौतम गंभीर सेल्फ आयसोलेट, स्वतः ट्विट करून दिली माहिती
-ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी कोहलीचे मोठे भाष्य, ‘या’ कारणामुळे दौरे मोठे नसावेत
-“वैयक्तिक कीर्तिमान महत्वाचे परंतु…”, दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमारची खास प्रतिक्रिया