विम्बल्डन: आज ४ भारतीय खेळाडूंचे सामने
कालच्या निराशाजनक दिवसानंतर आज ६व्या दिवशी चार भारतीय खेळाडू त्यांचे सामने खेळणार आहे. पुरुष दुहेरीतील भारताच आव्हान काल संपुष्ठात आले.
मिश्र दुहेरी
# मिश्र दुहेरीतच भारताची टेनिस स्टार आणि चतुर्थ मानांकित सानिया मिर्झा आणि तिचा जोडीदार इवान डोडिग हे जपानच्या युसुके वाटनुकी आणि माकोतो निनोमिया या जोडीशी दुसऱ्या फेरीत सामना खेळतील.
# भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची साथीदार गाब्रियेला डाबरोवस्की यांचा दुसऱ्या फेरीचा सामना फॅब्रीके मार्टिन आणि रालूका ओलारू या जोडीशी होत आहे.
# मिश्र दुहेरीच्या अन्य सामन्यात भारताचा पूरव राजा आणि त्याची साथीदार एरी हॉझुमी हे पहिल्या फेरीचा सामना जेम्स सरेटनी आणि रेनाटा वोरकॉव या जोडीशी खेळणार आहेत.
महिला दुहेरी
# आज भारताची सानिया मिर्झा ही दोन सामने खेळत असून तिचा दुसरा सामना अर्थात महिला दुहेरीचा आहे. १३व्या मानांकित सानिया मिर्झा आणि किर्स्टन फ्लिपकेर्न्स ही जोडी यजमान ग्रेट ब्रिटनच्या नामी ब्रॉयडय आणि हेअथेर वॉटसन या जोडीशी दुसऱ्या फेरीचा सामना खेळातील.
गर्ल्स सिंगल्स
# मुलींच्या एकेरीमध्ये १५व्या मानांकित झील देसाईचा सामना नाहो सातो या जपानच्या बिगरमानांकीत खेळाडूशी होणार आहे.
पुरुष दुहेरीमध्ये भारताचं आव्हान यापूर्वीच संपुष्ठात आलं असून महिला दुहेरीत भारताच्या संपूर्ण अशा या सानिया मिर्झावर टिकून आहेत. ती महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत पोहचली आहे. सिद्धार्थ बांठिया हा एकमेव खेळाडू मुलांच्या एकेरीमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. महक जैन ही सुद्धा झील देसाई प्रमाणे मुलींच्या एकेरीच्या पहिल्या फेरीत खेळणार आहे.