क्रिकेट विश्वात बांगलादेशसारख्या कमकुवत मानल्या जाणार्या संघाने आपल्या कामगिरीने गेल्या काही वर्षांत चमकदार कामगिरी करत अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. बांगलादेश क्रिकेट सातत्याने चांगली कामगिरी करत आहे आणि आता मोठ्या संघांनाही पराभूत करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. बांगलादेशच्या क्रिकेटमध्ये सुधारणा होताना दिसत आहे.
बांगलादेश क्रिकेट संघाने वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण कामगिरी सुरू ठेवली आहे. बांगलादेशच्या क्रिकेट खेळण्याच्या कौशल्याबाबत शंका नाही. परंतु या सर्वांमध्ये बांगलादेश क्रिकेट संघातील सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे अत्याधिक भावनिक होणे.
जेव्हा बांगलादेशी संघ गेल्या काही वर्षांत मैदानात यशस्वी होताना दिसला, तेव्हा त्यांच्या खेळाडूंनी विरोधी संघाप्रति अतिरिक्त भावना दर्शविल्या. विरोधी संघाला चिडवण्याचा एक नवीन मार्ग स्वीकारला. ज्यामध्ये ते प्रतिस्पर्धी संघाला चिडवण्यासाठी त्यांनी अनेक मर्यादा ओलांडल्या. ज्यामुळे या संघाला अनेकदा ट्रोल केले आहे. अशाच ४ घटनांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे, जेव्हा बांग्लादेशी खेळाडू त्यांच्या कृत्यामुळे ठरले हास्यास पात्र ठरले होते.
ते ४ प्रसंग जेव्हा बांगलादेशी क्रिकेटपटू त्यांच्या कृतीतून ट्रोल झाले –
निदाहास ट्रॉफीमध्ये मुशफिकुर रहीमने केले नागिन डान्स-
बांगलादेश क्रिकेट संघाच्या नागिन डान्सबद्दल आपल्याला माहित असेलच. बांगलादेशच्या सर्वात अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकर रहीमने हा नागिन डान्स निदाहास ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान केला होता.
मुशफिकुर रहीमने एका सामन्यात आश्चर्यकारकरित्या नागिन डान्स केला. श्रीलंकेने आयोजित केलेल्या निदाहास ट्रॉफी २०१८ मध्ये, मुशफिकुर रहीमने रोमांचक सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून दिल्यावर हा नागिन डान्स केला होता.
या विजयानंतर रहिमला स्वतःच्या भावनांना आवर घालता आला नाही आणि त्याने नागिन डान्स केला. असे काही होईल याची कोणी अपेक्षाही केली नव्हती. त्यानंतरही बांगलादेशचा संघ नागिन डान्सवरुन बराच ट्रोल झाला होता.
मुस्तफिजर रहमानने धोनीला टक्कर मारली-
बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू कोणत्या ना कोणत्या वादात सापडतात. मैदानात बांग्लादेश संघातील खेळाडूंच्या भावना अनावर होतात. असाच एक प्रसंग म्हणजे मुस्तफिजर रहमानने एमएस धोनीला टक्कर दिली होती.
२०१५ मध्ये भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशमध्ये वनडे मालिका खेळण्यासाठी गेला होता. या मालिकेच्या एका सामन्यात त्यावेळी बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान गोलंदाजी करत होता. भारताचा कर्णधार धोनीला गोलंदाजी करत असताना त्याने धोनीच्या धावण्याच्या मार्गामध्ये येऊन व्यत्यय आणण्याचा प्रयन्त केला. त्यानंतर धोनीने त्याला जोरदार षटकार खेचला. रहमानच्या या कृत्याबद्दल त्याला जोरदार ट्रोल केले गेले.
मुशफिकुर रहीमने केले सामना जिंकण्याआधीच सेलिब्रेशन
बांगलादेश खेळाडूंमधील एक माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीममध्ये बराच उत्साह आणि तीव्र भावना पाहायला मिळाली आहे. बांगलादेश संघाच्या विजयात मुशफिकुर रहीमने मोठी भूमिका बजावली असेल, परंतु मैदानावरील त्यांच्या खराब कृतीमुळे त्याला बऱ्याचदा लक्ष्य केले गेले आहे.
२०१६ मध्ये भारताविरुद्ध टी-२० विश्वचषक सामन्यात रहीमने शानदार फलंदाजी केली. अखेरच्या षटकात त्याने बांगलादेश संघाला विजयाच्या अगदी जवळ आणले, त्यानंतर तो आपला संयम कायम ठेवू शकला नाही आणि खराब पद्धतीने सेलिब्रेशन केले. खरं तर त्यावेळी बांगलादेशचा संघ विजयापासून फक्त २ धावा दूर होता.
पण त्याआधीच रहीमने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्याने स्वतःची विकेट गमावली. येथून बांगलादेशचा संघ सामन्यात १ धावेनी पराभूत झाला. त्यामुळे रहीमला विजयापूर्वीच केलेल्या त्याच्या सेलिब्रेशनसाठी चाहत्यांनी खूप ट्रोल केले.
बांगलादेशच्या १९ वर्षाखालील संघानेही केला नागिन डान्स मग भारतीय संघासोबत झाले वाद-
बांगलादेश क्रिकेट संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या नागिन डान्सचा प्रभाव ज्युनियर खेळाडूंवरही पडला. बांगलादेशच्या वरिष्ठ क्रिकेट संघाने हा नृत्य करून बर्याच वेळा प्रतिस्पर्धी संघाला चिडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी सुरु केलेला हा प्रवास ज्युनियर संघातही दाखल झाला.
यावर्षी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात, भारतीय संघाचा पराभव करून बांगलादेशच्या ज्युनिअर संघाने विश्वचषक जिंकला. पण विजयानंतर मैदानात असे कृत्य केले. या सामन्यानंतर बांगलादेश आणि भारतीय खेळाडूंमध्ये वादही झाले. ज्यावर संपूर्ण क्रिकेट विश्वातून कडक टीका झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
आईच सर्वकाही! आईमुळे घडलेले ५ महान क्रिकेटपटू
आधी वाढलेलं वजन कमी कर, मग निवडीचा विचार करू; बीसीसीआयचा ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला इशारा