---Advertisement---

कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी मैदानावर धावलेल्या फॅन्सबाबत मोठी अपडेट, पोलिसांनी केलीये कडक कारवाई

On: मंगळवार, मार्च 15, 2022 12:55 AM
Virat-Kohli-Fans
---Advertisement---

सामना सुरू असताना सुरक्षा रक्षकांना चकवत प्रेक्षक अनेकदा मैदानात घुसतात. यामुळे सामन्यात व्यत्यय तर येतोय, पण त्यामुळे मैदानावरील खेळाडूंच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न उपस्थित होतो. असेच काहीसे बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाले. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा चाहतावर्ग किती मोठा आहे, याची कल्पना आपल्याला आहेच. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते रांगा लावत असतात. मात्र, या सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या ४ चाहत्यांनी हद्दच पार केली. हे चाहते थेट सुरक्षा घेरा तोडत मैदानावर पोहोचले. मात्र, आता त्यांच्याबाबत अशी बातमी समोर येत आहे की, त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सोमवारी (१४ मार्च) या प्रकरणाची महिती देत सांगितले की, “ही घटना रविवारी (१३ मार्च) रात्री जवळपास १०.१५ वाजताची आहे. स्टेडिअममध्ये ४ मुले सुरक्षा व्यवस्था तोडत मैदानात घुसले होते. त्या चौघांनाही अटक करण्यात आली आहे.” पोलिसांनी सांगितले की, कबन पार्क स्टेशनमध्ये चारही मुलांविरोधात सुरक्षा व्यवस्था तोडण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे चौघेही विराटसोबत सेल्फी घेण्यासाठी मैदानात पोहोचले होते.

पोलिसांनी सांगितले की, चारही आरोपी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते. रविवारी भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात सामना खेळला जात होता. दरम्यान, दिवसाचा खेळ संपण्याच्या काही वेळापूर्वीच तरुणांनी सुरक्षा घेरा तोडून विराटच्या दिशेने धाव घेतली. यापैकी २ विराटसोबत सेल्फी घेण्यात यशस्वीही ठरले. चार आरोपींपैकी दोन अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.

बंगळुरूशी खास नाते
विशेष म्हणजे, बंगळुरू हे विराट कोहलीसाठी (Virat Kohli) दुसरे घर आहे. कारण, त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) याच शहरातील आहे. विराट इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत असल्यामुळे बंगळुरूमधील चाहत्यांचे त्याच्याशी खास नाते आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताच्या ३४ कसोटी कर्णधारांना जे जमलं नाही, ते रोहितने पहिल्याच कसोटी मालिकेत ‘करुन दाखवलं’

भयानक.! भारताच्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या झाडून हत्या

WTC Point Table: श्रीलंकेला धूळ चारल्याने भारताला मोठा फायदा, सलग दुसऱ्यांदा खेळू शकतो अंतिम सामना; घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---