---Advertisement---

भारताच्या ३४ कसोटी कर्णधारांना जे जमलं नाही, ते रोहितने पहिल्याच कसोटी मालिकेत ‘करुन दाखवलं’

On: सोमवार, मार्च 14, 2022 9:56 PM
captain rohit sharma
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये पार पडला. हा दिवस-रात्र कसोटी सामना होता. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध २३८ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारताने कसोटी मालिकाही आपल्या नावावर केली. भारताच्या विजयाचा शिल्पकार श्रेयस अय्यर ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले, तर मालिकावीर म्हणून रिषभ पंतचा सन्मान करण्यात आला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने या विजयासह पूर्णवेळ कसोटी कर्णधार बनताच नवे विक्रम प्रस्थापित केले.

कोणालाही न जमलेली केली कामगिरी

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विराट कोहलीने अचानकपणे कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची कसोटी संघाचा कर्णधार म्हणूनही निवड करण्यात आली. त्याच्या नेतृत्वात प्रथमच भारतीय संघ कसोटी मालिकेत उतरला. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने डावाने विजय साजरा केला होता. त्यानंतर, आता बेंगलोर कसोटी जिंकत रोहीतने एक मोठा विक्रम आपल्या नावे जमा केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाचे आतापर्यंत ३४ कर्णधारांनी नेतृत्व केले आहे. त्यापैकी रोहित एकमेव असा कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वात पहिल्याच कसोटी मालिकेत संघाने विरोधी संघाला व्हाईटवॉश दिला.

पूर्णवेळ कर्णधार बनताच केली मोठी कामगिरी

रोहित भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनल्यापासून संघाने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकही पराभव पाहिला नाही. न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाने निर्भळ यश मिळविले. त्यानंतर वेस्ट इंडिजला प्रत्येकी तीन सामन्यांच्या वनडे व‌ टी२० मालिकेत व्हाईटवॉश दिला. कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाने श्रीलंकेला तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतही ३-० अशा फरकाने पराभूत केलेले.

महत्वाच्या बातम्या-

WTC Point Table: श्रीलंकेला धूळ चारल्याने भारताला मोठा फायदा, सलग दुसऱ्यांदा खेळू शकतो अंतिम सामना; घ्या जाणून (mahasports.in)

आयपीएल २०२२मधील गोलंदाजांची एमएस धोनी करणार चांगलीच धुलाई! विश्वास बसत नसेल, तर ‘हा’ व्हिडिओ पाहाच (mahasports.in)

सुरक्षा घेरा तोडून मैदानात घुसलेल्या दर्शकांबद्दल बुमराहची मोठी प्रतिक्रिया; विराटच्या जवळ पोहोचले होते चाहते (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---