आयपीएल २०२२( IPL 2022) चा पहिला सामना २६ मार्च रोजी खेळला जाणार आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामाच्या तयारीला संघ लागले आहेत. एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ सुरतमध्ये सराव करत आहे. सीएसकेने आतापर्यंत ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. यावर्षी सुद्धा सीएसके संघ आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. यापूर्वीच धोनीने बाकी संघांसाठी खतऱ्याची घंटा वाजवली आहे. तो नेटमध्ये ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे, त्यावरून तरी असेच दिसत आहे. मात्र, आयपीएल २०२१ मध्ये धोनी काही खास कामगिरी करू शकला नव्हता.
आयपीएल २०२२ मध्ये धोनीने १६ सामन्यांत १६.२९ च्या सरासरीने १४४ धावा केल्या होत्या, परंतु एक कर्णधार म्हणून त्याने संघाला विजेतेपद जिंकून दिले होते. यावर्षी एमएस धोनी कर्णधार पदासोबतच फलंदाजीत देखील दमदार कामगिरी करताना दिसण्याची शक्यता आहे.
सीएसकेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ नेटमधील दिसत आहे. यामध्ये धोनीने गोलंदाजाच्या डोक्यावरून इतका मोठा षटकार लगावला की, तो स्टेडियममधून बाहेर गेला. ज्या पद्धतीने धोनीने फिरकी गोलंदाजाविरुद्ध पायांचा वापर करून हा शाॅट लगावला, त्यावरून विंटेज धोनीची आठवण झाली.
चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात जास्तीत जास्त जुन्या खेळाडूंना विकत घेण्यास यशस्वी झाली आहे. लिलावात सीएसके फ्रॅंचायझीने राॅबिन उथप्पा, अंबाती रायडू, ड्वेन ब्रावो आणि दीपक चाहरला विकत घेतले आहे. सीएसकेचा पहिला सामना २६ मार्चला कोलकाता संघासोबत खेळणार आहे. या दोन्ही संघांनी २०२१ च्या आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता. यामध्ये सीएसकेने विजय मिळवत आयपीएल २०२१ चा अंतिम सामना जिंकला होता. यावर्षी आयपीएलमध्ये ८ नव्हे, तर १० संघ खेळताना दिसणार आहेत. लखनऊ आणि गुजरात संघ या लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. हे सर्व संघ दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहेत. आयपीएलच्या १५ व्या हंगाम मुंबई आणि पुणे येथे खेळले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
हे काय नवीन! इंग्लंडची फलंदाज गर्रकन फिरली अन् उलटा शॉट मारत झाली आऊट; व्हिडिओ ठरतोय लक्षवेधी
‘असा’ नकोसा विक्रम कुणाच्याही नावावर नको! महिला विश्वचषकात पराभवाच्या बाबतीत पाकिस्तानने कापलं नाक