येत्या नववर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिज येथे आयसीसीची १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा (ICC U19 Cricket World Cup 2022) होणार आहे. १४ जानेवारी- ५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी रविवारी (१९ डिसेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय, BCCI) १७ सदस्यीय संघ घोषित केला आहे. या संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे यश धुल याच्या हाती देण्यात आली आहेत. तर एसके राशिद संघाचा उपकर्णधार असेल. विशेष म्हणजे, या संघात महाराष्ट्राच्या ३ खेळाडूंना जागा मिळाली आहे.
कौशल तांबेसह आरएस हंगरगेकर आणि विकी ओत्सवाल हे ते ३ मराठमोळे खेळाडू आहेत. तसेच मुख्य संघाबरोबर ५ स्टँडबाय खेळाडूही या संघाचा भाग असतील.
भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे आयसीसी विश्वचषकातील प्रदर्शन अतिशय उल्लेखनीय राहिले आहे. त्यांनी आतापर्यंत या स्पर्धेत सर्वाधिक ४ वेळा विजेतेपद पटकावले आहे. २०००, २००८, २०१२ आणि २०१८ सालची १९ वर्षांखालील विश्वचषक ट्रॉफी भारताच्या घरी आली आहे. तसेच २०१६ आणि २०२० च्या हंगामात भारताचा १९ वर्षांखालील संघ उपविजेताही राहिला आहे.
Here's India's squad for ICC U19 Cricket World Cup 2022 squad 🔽 #BoysInBlue
Go well, boys! 👍 👍 pic.twitter.com/im3UYBLPXr
— BCCI (@BCCI) December 19, 2021
Standby players:
Rishit Reddy – Hyderabad Cricket Association
Uday Saharan – Punjab Cricket Association
Ansh Gosai – Saurashtra Cricket Association
Amrit Raj Upadhyay – Cricket Association of Bengal
PM Singh Rathore – Rajasthan Cricket Association#BoysInBlue— BCCI (@BCCI) December 19, 2021
अशी आहे स्पर्धेची रुपरेषा-
आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकाचा हा १४ वा हंगाम असेल. या हंगामात भारतासहित १६ वेगवेगळे संघ ४८ सामने खेळतील. या १६ संघांना ४ वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले जाईल. या प्रकारात अव्वल दोन संघ हे ४ ग्रुपमधून सुपर लीगला जातील तर राहिलेले संघ प्लेट गटात २३ दिवस खेळतील. भारतीय संघाचा ब गटात समावेश आहे.
आयसीसी १९ वर्षांखालील स्पर्धेसाठी भारताचा १७ सदस्यीय संघ- यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंघक्रिश रघुवंशी, एसके राशिद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्य यादव (यष्चीरक्षक), राज अंगद बावा, मानव प्रकाश, कौशल तांबे, आर एस हंगरगेकर, वासू वत्स, विकी ओत्सवाल, रविकुमार, गर्व संगवान.
स्टँडबाय खेळाडू- ऋषित रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय, पीएम सिंह राठौर
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! जोरदार शिंकेमुळे कोलमडली वॉर्नरची खुर्ची, पाहून घाबरले आजूबाजूचे सहकारी; व्हिडिओ व्हायरल