वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या १८ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्त्व रोहित शर्माच करणार आहे. या संघातून एकीकडे विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे एक-दोन नव्हे तर तब्बल ४ यष्टीरक्षकांना संघात सामाविष्ठ करण्यात आले आहे. त्यामुळे आता यांपैकी कोणाकोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल आणि कोण यष्टीरक्षण करेल? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
युवा यष्टीरक्षक आणि सध्या भारताच्या टी२० संघात सलामीची जबाबदारी पार पाडत असलेला इशान किशन (Ishan Kishan) वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेचा भाग आहे. तर फिनिशरची भूमिका निभावत असलेला दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) हादेखील संघात आहे. तोही भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आहे. तसेच फॉर्मात असलेल्या प्रमुख यष्टीरक्षक रिषभ पंतलाही (Rishabh Pant) संघात सहभागी करण्यात आले आहे.
याखेरीज दुखापतीतून सावरत असलेल्या केएल राहुललाही (KL Rahul) संघात सामाविष्ट करण्यात आले आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवणे किंवा न खेळवणे, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. तोदेखील इशानप्रमाणे भारताच्या टी२० संघाकडून सलामीला फलंदाजीला येतो.
अशात या ४ यष्टीरक्षकांपैकी यष्टीरक्षणाची जबाबदारी पंतच्या खांद्यावर येणे निश्चित आहे. तो मधल्या फळीतील फलंदाज असून मागील काही वर्षांपासून संघाचा प्रमुख यष्टीरक्षण बनला आहे.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या,रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
केएल राहुल आणि कुलदीप यादव (फिटनेसबाबत अनिश्चितता)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा नाणेफेकीत रोहितचीच बाजी, सलग दुसरी वनडे जिंकत इतिहास रचण्याचे लक्ष्य; पाहा प्लेइंग इलेव्हन
आयसीसी क्रमवारीत अव्वल असलेला जसप्रीत बुमराह विंडीजच्या दौऱ्यातून बाहेर, कारण माहितीय का?
क्रिकेटविश्वावर शोककळा, माजी भारतीय दिग्गजाचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन