---Advertisement---

‘चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत ३१ संघ सहभागी, ८ जानेवारीपासून स्पर्धेस प्रारंभ

On: बुधवार, जानेवारी 5, 2022 6:55 PM
Tennis
---Advertisement---

पुणे। मुकुंद जोशी आणि डॉ.अमित पाटणकर यांच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पुण्यातील विविध क्लबमधील एकुण 31 संघांमध्ये 300हून अधिक खेळाडू सहभागी झाले असून ही स्पर्धा फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे दि.8 जानेवारी 2022 पासून सुरु होणार आहे.

स्पर्धेला आनंद राठी वेल्थ लिमिटेड यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत विजेत्या संघाला 20 हजार रूपये व करंडक, तर उपविजेत्या संघाला 10हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेत डेक्कन चार्जर्स, हॉक्स, महाराष्ट्र मंडळ, मॉँटव्हर्ट प्रीस्टाईन, टायगर्स, टेनिसनट्स आरएएफए, ऍव्हेंजर्स, रिअल एसेस, ग्लॅडिएटर्स, एफसी 3, टेनिस द मिनॅक, सोलारिस गोगेटर्स, एमडब्लूटीए, ओडीएमटी 2, लायन्स, सोलारिस डायनामोज, टेनिसनट्स रॉजर, ऋतुपर्ण, एमडब्लूटीए 3, एफसी 4, एफसी 1, एमडब्लूटीए 2, ओडीएमटी 1, एसेस युनायटेड, पीसीएलटीए, ईगल्स, एफसी 2, एमडब्लूटीए 4, डेक्कन आरएफ, लॉ चार्जर्स, अर्ली बर्ड्स हे संघ झुंजणार आहेत.

तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद फेरीत होणार आहे. दुहेरीचे 2 सामने खुल्या गटात होणार आहेत. दोन सामने 90 अधिक व 100 अधिक या गटात होणार आहेत. शहरातील हौशी टेनिसखेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून या गटाचे सामने होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर १२ वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत ओम साई अकादमीचा मोठा विजय

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत 18 व्या मानांकित कारास्तेवसह अव्वल 100 खेळाडूमधील आठ खेळाडूंचे आकर्षण

पीएमडीटीए मानांकन वरिष्ठ व हौशी टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंकित कापसे, नरेश अरोरा, नरेंद्र पवार, अमित शर्मा यांची आगेकूच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---