---Advertisement---

चार सामने चार सलामी जोड्या! वनडे संघातील जागेसाठी टीम इंडियात जोरदार रस्सीखेच

On: मंगळवार, जानेवारी 10, 2023 3:06 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील पहिला मंगळवारी (10 जानेवारी) खेळला जात आहे. गुवाहाटीच्या बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे सलामीला उतरले. यासह भारताने मागील चार सामन्यात चौथी नवी सलामी जोडी मैदानात उतरवली.

भारतीय संघासाठी बांगलादेश दौऱ्यानंतर पुनरागमन करत असलेल्या रोहित शर्मासह शुबमन गिल सलामीला उतरताना दिसला. यासह भारताने मागील चार वनडे सामन्यात ही चौथी नवी जोडी सलामीला उतरवली. भारतीय संघाने आपली अखेरची वनडे मालिका बांगलादेशमध्ये खेळलेली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात शिखर धवन व रोहित शर्मा ही भारताची सर्वात अनुभवी सलामी जोडी मैदानात उतरताना दिसली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्मा याला दुखापत झाली. त्यामुळे या सामन्यात शिखरसह विराट कोहली सलामीला मैदानात आला. तर, तिसऱ्या सामन्यात रोहित अनुपस्थितीत असल्याने ईशान किशन याला संधी देण्यात आलेली. विशेष म्हणजे ईशानने या सामन्यात द्विशतक ठोकल्यानंतरही त्याला या सामन्यासाठी संघात निवडले नाही.

भारताने मागील सात वनडे मालिकांमध्ये विविध सलामी जोड्या खेळवल्या आहेत. इंग्लंडमध्ये रोहित शर्मा व शिखर धवन यांनी संघासाठी सलामी दिलेली. वेस्ट इंडीज दौऱ्यावर शिखर व गिल यांना संधी मिळालेली. झिम्बाब्वे दौऱ्यावर शिखर-राहुल व शिखर-गिल यांनी भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका बजावली होती. त्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर तीन वेगवेगळ्या जोड्या व आता ही आणखी एक नवी जोडी भारतीय संघात पाहायला मिळत आहे.

(Fourth Opening Pair For India In Last Four ODI)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉचे झंझावाती शतक, वादळी खेळी करत बीसीसीआयच्या निवड समितीला फटकारले!
विराटची नजर सचिनच्या ‘त्या’ वर्ल्ड रेकॉर्डवर, श्रीलंकेविरुद्ध करणार का कमाल?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---