सध्या ब्रिटनमध्ये व्हिटॅलिटी टी20 ब्लास्ट स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेतील एका लाईव्ह सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे मैदानावरील सर्वच थक्क झाले.
वास्तविक, लाईव्ह सामना सुरू असताना मैदानात चक्क एक कोल्हा घुसला. लंडन येथे झालेल्या हॅम्पशायर विरुद्ध सरे सामन्यात ही घटना घडली. कोल्हा मैदानात घुसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे, कोल्ह्यानं कोणाचंही नुकसान केलं नाही.
मैदानात घुसल्यानंतर कोल्हा सतत धावत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. तथापि, कोल्ह्याला बाहेर काढण्यासाठी कोणाच्याही मदतीची गरज भासली नाही. कोल्ह्यानं स्वतःचा मार्ग स्वत: शोधला आणि सीमारेषा पार करून बाहेर चालला गेला. मैदानात घुसलेल्या कोल्ह्याला पाहून प्रेक्षकांचं मात्र भरपूर मनोरंजन झालं. काहींनी जोरजोरात शिट्ट्याही वाजवल्या.
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका व्यक्तीने लिहिलं, “क्रिकेट मॅचमध्ये साप, कुत्रा आणि मधमाश्यानंतर आता कोल्ह्याची एंट्री झाली आहे.” एका यूजरनं म्हटलं, “कोल्ह्याला क्रिकेट खेळायचं होतं असं वाटतं”. “कदाचित तो एक चांगला क्षेत्ररक्षक बनू शकते,” असं दुसऱ्यानं लिहिलं. तुम्ही या घटनेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Fox invades the field in Vitality Blast. 😄pic.twitter.com/dENXcc1wIL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 20, 2024
हॅम्पशायर विरुद्ध सरे सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, हा सामना हाय स्कोअरिंग आणि रोमांचक होता. हॅम्पशायरनं सरे समोर 184 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, ज्याचा सरेनं पाच चेंडू बाकी असताना यशस्वी पाठलाग केला. सरेसाठी अष्टपैलू सॅम करननं झंझावाती शतक झळकावलं. त्यानं 58 चेंडूंचा सामना करत नाबाद 102 धावा ठोकल्या. करननं आपल्या खेळीत 7 चौकार आणि 6 षटकार मारले. विशेष म्हणजे, करनचं हे टी20 क्रिकेटमधील पहिलंच शतक आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गौतम गंभीरची इच्छा पूर्ण! टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये दाखल होणार केकेआरमधील साथीदार
आयपीएल 2025च्या मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंतला सोडणार?
टीम इंडियासमोर पाकिस्तानचे पानिपत! दीड महिन्यात तीनदा लोळवले