फ्रान्सचा प्रसिद्ध फुटबॉलर व मँचेस्टर सिटीसाठी खेळणाऱ्या बेंजामिन मेंडी याच्यावर बल’त्काराचे आरोप करण्यात आले आहेत. एकापेक्षा अधिक महिलांनी त्याच्यावर हे आरोप केले असून, त्याची चेस्टर ग्राउंड कोर्टात सुनावणी सुरू आहे. मात्र, मेंडीने हे सर्व आरोप फेटाळून लावलेत.
फ्रान्सने २०१८ मध्ये जिंकलेल्या फुटबॉल विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावणारा मेंडी संकटात सापडताना दिसतोय. एकापाठोपाठ एक अशा आठ महिलांनी त्याच्यावर बलात्काराचे आरोप केले असून, यासंबंधी काही पुरावे देखील सादर केले आहेत. ऑक्टोबर २०१८ ते ऑगस्ट २०२१ या काळात ही सर्व प्रकरणे घडल्याचे पीडित महिलांकडून सांगण्यात येत आहे.
एका वीस वर्षीय पिढीतेने आपल्यावर ओढवलेल्या या आपबीतीची कहाणी कोर्टात कथन केली. तिने सांगितल्यानुसार, “ऑक्टोबर २०२० मध्ये माझी व मेंडीची एका बारमध्ये ओळख झाली होती. त्याचा साथीदार फुटबॉलपटू जेसी लिंगार्ड हा देखील त्यावेळी उपस्थित होता. त्यानंतर मेंडी आपल्याला त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने आपल्या फिंगर प्रिंट लॉक असलेल्या रूममध्ये मला नेले. यादरम्यान त्याने माझा मोबाईल हिसकावून घेतला होता. त्याचवेळी त्याने मला संबंध ठेवण्यासाठी विचारणा केली. मात्र, मी त्या गोष्टीस नकार दिल्यानंतर त्याने बळजबरीने माझ्याशी संबंध ठेवले. त्यावेळच्या संभाषणात मेंडी म्हणाला होता की, मी आतापर्यंत १०,००० महिलांशी संबंध ठेवलेले आहेत.”
सध्या २८ वर्षांचा असलेला मेंडी २०१७ पासून फ्रान्स संघासाठी खेळतो. लेफ्टबॅक पोझिशनवर खेळणारा मेंडी २०१८ विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. लीग फुटबॉलमध्ये तो मँचेस्टर सिटीचे करतो. मात्र, २०२१ मध्ये त्याच्यावर प्रथमता लैंगिक शोषणाचे आरोप झाले असताना त्याला संघाने निलंबित केले आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेट खेळण्यापेक्षा अंपायर होणे अवघड! बीसीसीआयच्या पंच परीक्षेतील नापासांचे प्रमाण धक्कादायक
फलंदाजांना गुडघे टेकायला लावणारा अख्तर वापरतोय ‘कुबड्या’, वाचा कशामुळे आली ही वेळ
एकेवेळी १० पेग पिऊन शतक ठोकणारा कांबळी आता नोकरीसाठी दारुही सोडायला तयार