---Advertisement---

क्रिकेट खेळण्यापेक्षा अंपायर होणे अवघड! बीसीसीआयच्या पंच परीक्षेतील नापासांचे प्रमाण धक्कादायक

On: शुक्रवार, ऑगस्ट 19, 2022 4:13 PM
BCCI-Umpires
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सातत्याने भारतातील क्रिकेट उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी प्रयत्न करत असते. यामध्ये केवळ खेळाडूच नव्हे तर क्रिकेटसंबंधी सर्व बाजूंना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजनांचा अवलंब केला जातो. याच प्रयत्नांचा भाग म्हणून प्रत्येक राज्यात बीसीसीआयकडून उदयोन्मुख पंचांसाठी विविध स्तरांवर परीक्षा घेतल्या जातात. त्यातीलच द्वितीय दर्जाच्या पंचांसाठी घेतलेल्या एका परीक्षेच्या निकालाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अहमदाबादमध्ये नुकतीच पंचांसाठी लेव्हल-टू परीक्षा पार पडली. या परीक्षेची काठीण्यपातळी इतकी उच्च होती की होती की १४० उमेदवारांपैकी केवळ तीनच परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. उर्वरित १३७ उमेदवारांना निराश होऊन परतावे लागले.

एका प्रमुख वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ही परीक्षा एकूण २०० गुणांची होती. यासाठी कट ऑफ ९० गुणांचा ठेवला गेलेला. २०० गुणांपैकी शंभर गुण लेखी परीक्षेचे, प्रत्येकी ३५ गुण तोंडी व व्हिडिओ परीक्षेचे आणि उर्वरित तीस गुण शारीरिक चाचणीचे होते.

बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले,

“परीक्षा नक्कीच अवघड होती. मात्र, आम्ही गुणवत्तेशी कोणताही समझोता करणार नाही. तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पंच म्हणून काम करायचे असल्यास तुमच्याकडे त्या सर्व गोष्टी हव्यात ज्या तुम्हाला एक उत्कृष्ट पंच म्हणून ओळख देतील.”

बीसीसीआयमध्ये पंच म्हणून रुजू होण्यासाठी लेव्हल- वन व लेवल टू अशा दोन परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. बीसीसीआयने आपल्या सर्व पंचांना पाच गटांमध्ये विभागले आहे. यातील ए व ए प्लस गटातील पंचांना प्रतिदिवशी ४०,००० हजार व बी, सी, डी गटातील पंचांना दरदिवशी ३०,००० हजार इतके मानधन देण्यात येते.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

अशी आशिया चषकाचा तयारी होणार का?’ सामना जिंकल्यानंतरही राहुलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

‘धोनी विराट अन् रोहितला लाभलं नाही ते भाग्य दीपक हुड्डाच्या नशीबी!’ ठरतोय इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर

भारताच्या दौऱ्यामुळे झिम्बाब्वे बोर्डाची चांदी, ३ वनडे सामन्यांतून कमावणार ‘इतके’ कोटी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---