---Advertisement---

एमबाप्पेने फिफा विश्वचषकात मिळालेल्या बक्षिसाची सर्व रक्कम केली दान

On: गुरूवार, जुलै 19, 2018 7:30 AM
---Advertisement---

विश्वविजेता फ्रान्सचा फॉरवर्ड फुटबॉलपटू कायलिन एमबाप्पे याने पाच लाख युएस डॉलर विशेष मुलांसाठी खेळाचे आयोजन करणाऱ्या चॅरीटी क्लबला दान केले आहे.

या 19वर्षीय खेळाडूला प्रत्येक सामन्यातून 22,300 युएस डॉलर मिळाले. तर 3,50,000 युएस डॉलर देशाने विजेतेपद जिंकल्याने मिळाले आहेत.

एमबाप्पेने या एका महिन्यात झालेल्या स्पर्धेत एकूण 500,000 लाख युएस डॉलर कमावले. हे सगळे पैसे त्याने प्रिमीयर डी कॉर्डी या चॅरीटी क्लबला दिले आहे.

“एमबाप्पेने आम्हाला त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून मुलाखतीसाठी वेळ दिला. यावेळी त्याने मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी चांगल्या गोष्टी सांगितल्या”, असे प्रिमीयर डी कॉर्डीचे व्यवस्थापक सेबॅस्टियन रफिन म्हणाले.

एमबाप्पे हा नेमार नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू

एमबाप्पेला 2018च्या फिफा विश्वचषकाचा ‘सर्वोत्तम युवा खेळाडू’चा पुरस्कार मिळाला आहे. त्याने या स्पर्धेत एकूण चार गोल केले आहेत.

त्याने क्रोएशिया विरुद्धच्या सामन्यात गोल केल्याने ब्राझिलचा दिग्गज फुटबॉलपटू पेलेनंतर गोल करणारा कमी वयाचा खेळाडू ठरला.

तसेच पॅरीस सेंट-जर्मन खेळाडू एमबाप्पे (208 युएस डॉलर) हा नेमार नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

फिफा विश्वचषकात क्रोएशियाचे सुवर्ण पदकाचे स्वप्न होणार साकार?

फिफा विश्वचषक 2018: म्हणून क्रोएशियाचा डिफेंडर डेजन लोव्हरेनचा राग झाला अनावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment